माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 2 October 2017

लिहिणा-यांची(अदलाबदली) गटशर्यत

                  उपक्रम
● लक्षपूर्वक ऐका आणि खेळ खेळा--
- लिहिणा-यांची अदलाबदली गटशर्यत
शेवटच्या बाकापासून सुरू करावी.
शिक्षकांनी एक शब्द सांगावा. एका
बाकावरील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी
सांगितलेल्या शब्दांशी संबंधित शक्य
तेवढे शब्द /शब्दसमूह लिहून काढावेत.
त्यांना हे शब्द/शब्दसमूह एका मिनिटात
लिहायचे आहेत. त्यांनी तो कागद पुढच्या
बाकावरील विद्यार्थ्यांना द्यावा. प्रत्येक
बाकावरील विद्यार्थ्यांना एक मिनिटाचा
कालावधी मिळेल. त्यांनी त्या कागदावर
नवीन शब्दांची भर घालावी. शेवटी
शिक्षकांनी/गटप्रमुखांनी पहिल्या बाकावरून
कागद जमा करावेत. गटप्रमुखांने
कागदावरील शब्द वाचून दाखवावेत.
जास्तीत जास्त शब्द/ शब्दसमूह लिहिणारे
विद्यार्थी शर्यत जिंकतील. अर्थातच,शब्द
अचूक असणे आवश्यक आहे ! सर्वांना
शुभेच्छा. चला तर मग, शर्यत सुरू करूया.
■ शर्यतीसाठी शब्द :--
(१) पक्षी :--
--- उडणे, पंख,  घरटे, चोंच, पिसे,
रंगीबेरंगी, लहान, मोठे, सुंदर, पाळीव,
जंगली, झाडे, पोपट,  कोंबडी, अंडी,
थवा, पाय, नख्खा इ.
------------------------------------------
(२) भाजीपाला :--
---- हिरवा, चवदार, कापणे, चिरणे, अन्न,
शिजवणे, भेंडी, मेथी,बटाटा इ.
-----------------------------------------
(३) फुले :-
---- माळ,  पूजा, गजरा, बाग, गुलाब,
झेंडू, देठ, सुगंध, गुच्छ, पिवळे, लाल,
कळी, अत्तर, मोगरा इ.
-------------------------------------------
(४) घर :--
---- खांब, भिंत, खोली, वीट, दरवाजा,
खिडकी, छप्पर, पडवी, जिना, मजला,
स्नानगृह, शौचालय, चौकट, उंबरठा इ.
-------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment