(१)प्रदूषण टाळा , पर्यावरण सांभाळा !
(२) प्रदूषण रोखा, पर्यावरण राखा !
(३) प्रदूषण घालवा, पर्यावरण वाचवा !
(४) प्रदूषणावर मात, पर्यावरणाला साथ !
(५) टाळा तुम्ही प्रदूषण ,
करू पर्यावरणाचे रक्षण !
(६) जर टाळल प्रदूषण,
तर होईल पर्यावरण रक्षण !
(७) फटाक्यांचा वापर टाळा,
प्रदूषणाला बसवा आळा !
(८) फटाकेमुक्त दिवाळी कशासाठी ?
सर्वांच्या सुखासाठी !
(९) पर्यावरण-रक्षण, राष्ट्राचे संरक्षण !
(१०) पर्यावरण - रक्षण, हेच मूल्यशिक्षण !
(११) निसर्ग माझी माता, मी तिचा रक्षणकर्ता !
(१२) करू रक्षण पर्यावरणाचे,
साधेल कल्याण मानवाचे !
(१३) माणुसकीला जागू,
दिवाळी फटाकेमुक्त साजरी करू.
(१४) ऐक मनुजा पर्यावरणाची हाक
निसर्गासाठी आता तरी वाक
(१५) घ्या काळजी ध्वनिप्रदूषणाची
नाहीतर होईल धूळधाण आयुष्याची
(१६) वायू प्रदूषण करू नका,
आजाराला निमंत्रण देऊ नका.
(१७) प्रदूषण मुक्त गाव,
सर्वत्र होईल त्याचे नाव.
(१८) फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया,
प्रदूषणाला आळा घालूया.
(१९) प्रदूषण मुक्त दिवाळी घरोघरी,
पर्यावरण राखू गावोगावी.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment