माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 13 October 2017

वाचनामुळेच..........

          
 वाचनामुळेच गोष्टी व गाण्यांचा आनंद
      आपल्याला मिळतो.
 वाचनामुळेच आपण इतिहासातील गोष्ट
    वाचतो.
 वाचनामुळेच फार फार वर्षांपूर्वीच्या
     घटना आपल्याला कळतात.
  वाचनामुळेच आपल्याला आपल्या देशाची
     व जगाची माहिती मिळते.
  वाचनामुळेच लोकांचे जीवन कळते.
 वाचनामुळेच विविध विषयांची माहिती
      मिळते.
वाचनामुळेच ज्ञान वाढते आणि अज्ञान
     दूर होते.
 वाचनामुळेच आपले मनोरंजन / करमणूक
     होते.
 वाचनामुळेच प्रवासात पुस्तकाची चांगली
     सोबत होते.
 वाचनामुळेच  ज्ञानप्राप्ती होते.
 वाचनामुळेच खूप गोष्टींची माहिती होते.
 वाचनामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रांत काम
      करणाऱ्या माणसांची आत्मचरित्रे
      वाचता येतात.
 वाचनामुळेच शिकलेला माणूस आपली
      योग्य प्रगती करू शकतो.
 वाचनामुळेच एकांतवासही सुखावह
     होतो.
 वाचनामुळेच माणूस विविधांगी ज्ञानसमृद्ध
     होऊ शकतो.
 वाचनामुळेच आज कोणत्याही क्षेत्रातील
    ज्ञान असाध्य नाही.
 वाचनामुळेच व्यक्तीचे व्यक्तीमत्व समृद्ध
     होते.
  वाचनामुळेच  विशाल जगाचा परिचय
      होतो.
 वाचनामुळेच ज्ञान आणि मनोरंजन या
     दोन्हीही गोष्टी या छंदातून साध्या होतात.
  लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment