(घटनाक्रम वाचून योग्य क्रमाने वाक्य सांगणे)
● कृती :--
१. शिक्षकाने छोट्या उता-याचे वाक्य योग्य
क्रमाने फळ्यावर लिहून वाचन करून घ्यावे.
२. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक वाचावे.
३. विद्यार्थ्यांना वाक्य योग्य क्रमाने न बघता
सांगण्यास सांगावे.
४. आवश्यक तेथे शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.
■ नमुना उतारा संच/ वाक्य संच :--
१ .आईने धान्य निवडले.
सुमितने धान्य गिरणीत नेले.
गिरणीवाल्याने धान्य दळले.
सुमितने दळण घरी आणले.
आईने पिठाची भाकरी केली.
--------------------------------------------
२. सानिया सकाळी लवकर उठली.
तिने दात घासून तोंड धुतले.
अंघोळ करून स्वच्छ कपडे घातले.
जेवण करुन ती शाळेत गेली.
---------------------------------------------
३. शाळेची घंटा झाली.
मुले मैदानावर आली.
रांगेत उभी राहिली.
राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा झाली.
मुले परिपाठात रमली.
---------------------------------------------
४. मुलांनी माती घेतली.
पाणी टाकून चिखल केला.
छान - छान खेळणी बनवली.
बाईंनी शाबासकी दिली.
--------------------------------------------
५. शाळा सुटली.
सुप्रिया घरी आली.
दप्तर नीट ठेवले.
हात पाय स्वच्छ धुतले.
शांतपणे खाऊ खाल्ला.
नंतर खेळायला गेली.
-------------------------------------------
६. उन्हाळा सुरू झाला.
पाण्याची वाफ झाली.
वाफेचे ढग तयार झाले.
ढगांना गार हवा लागली
पाऊस पडू लागला.
-----------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment