माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 7 October 2017

आपला भारत

            आपला देश भारत. तो खूप मोठा आहे. भारताच्या उत्तरेकडे जगातील सर्वात उंच हिमालय पर्वत आहे. दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. हे भारताचे वैभव आहे.
     गंगा, यमुना,गोदावरी, ब्रम्हपुत्रा, कृष्णा ह्या भारतातील प्रमुख नद्या आहेत. भारतात खनिज- संपत्ती देखील पुष्कळ आहे. हजारो औषधी वनस्पती भारतात सापडतात. पशुपक्ष्यांचे हजारो प्रकार भारतात सापडतात. भारत कलाकुसरी -साठी प्रसिद्ध आहे. भरपूर सूर्यप्रकाश व पाऊस असल्यामुळे भारतात सर्व प्रकारची पिके होतात. भारतात अनेक धर्माचे लोक राहतात.हिंदू,शीख, जैन,मुसलमान, ख्रिश्चन असे कितीतरी धर्माचे लोक एकत्र नांदतात.भारतातील लोकांच्या भाषाही अनेक आहेत. मराठी,  कन्नड, तमिळ,उर्दू , बंगाली, हिंदी इत्यादी. वेगवेगळ्या प्रांतात
काही चालीरीती देखील वेगळ्या आहेत. असे असूनही सगळे भारतीय मनाने एक आहेत. तिरंगी राष्ट्रध्वज, जनगणमन हे राष्ट्रगीत, वाघ राष्ट्रीय प्राणी, कमळ राष्ट्रीय फूल, मोर हा राष्ट्रीय पक्षी, ही भारताची मानचिन्हे आहेत.
    भारताचे नेते देशाच्या विविध भागांतून आलेले आहेत. त्यातील लोकमान्य टिळक,  महात्मा गांधी,  पंडित नेहरू,  सुभाषचंद्र बोस आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ही नावे भारतातील सर्व लहानथोरांना माहीत आहेत.
   भारतामध्ये अठरा वर्षांवरील प्रत्येक प्रौढाला मतदानाचा हक्क आहे. ह्या पध्दतीने आपण आपले नेते निवडत असतो. राज्यकारभाराची जबाबदारी ते आपल्या वतीने घेत असतात.ह्याला आपण लोकशाही म्हणतो. समता, बंधुभाव, व्यक्ती - स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय हा भारताच्या लोकशाही जीवनाचा पाया आहे.

  ✍ शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
        जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
        ता. साक्री जिल्हा धुळे
       📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment