माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 1 October 2017

महात्मा गांधी

 

    महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत.
त्यांचे नाव मोहनदास गांधी असे होते.
त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे
नाव पुतळीबाई होते. गांधीजींचा जन्म
२ आॅक्टोबर, १८६९  ला गुजरात मधील
पोरबंदर या ठिकाणी झाला. लहानपणी
मोहनदास अभ्यासात साधारण होते, पण
त्यांच्या मनात आई - वडिल व गुरूजनांविषयी
अतोनात आदर होता. मॅट्रिक परीक्षा पास
झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला
गेले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू
लागले.
     इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात
आले. काही दिवस वकिली म्हणून काम
केल्यावर एका खटल्यासाठी त्यांना दक्षिण
आफ्रिका येथे जावे लागले. तेथे अनेक
भारतीय व्यापारी आणि मजूर रहात होते.
त्यांच्यावर फारच अन्याय होत असत.
भारतीयांच्या हक्कासाठी अहिंसक लढा दिला.
शेवटी त्याचा जय झाला.
     गांधीजी  जेव्हा भारतात परतले तेव्हा येथे
सुध्दा जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या
नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी
त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी
केली.भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी,अत्याचारी,
जुलमी सत्तेतून बाहेर करण्यासाठी सत्याग्रहाच्या
व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करण्याचा निर्धार
केला. देशासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास
भोगला. गांधींचे संपूर्ण जीवन त्यागाचे होते.
म्हणून त्यांना लोक 'बापू ' म्हणत. तसेच
त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी त्यांना
 'महात्मा ' ही पदवी दिली. सारा देश त्यांना
राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.
      इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी
अहिंसा, असहकार, स्वदेशीचा वापर या
सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग
पाडले. 'चले जाव ' चळवळ, दांडी यात्रा अशा
विधायक मार्गाचा वापर करून भारताला
१५ आॅगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.
   देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी
झाली. एका देशाचे दोन देश निर्माण झाले.
काहींना ही गोष्ट खटकली आणि याच
कारणामुळे ३०जानेवारी १९४८ रोजी महात्मा
गांधीजींची हत्या झाली. ते काळाच्या पडद्याआड
गेले.

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प. प्रा. शाळा बांडीकुहेर 
               ता.साक्री जि.धुळे 
                ९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment