-- कानाला कर्कश्श वाटणारा, ऐकण्यासाठी
त्रासदायक ठरणारा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण
होय. मोठमोठय़ा आवाजात लावलेले रेडिओ,
ध्वनिक्षेपक यंत्रणा,म्युझिक सिस्टीम,टेपरेकॉर्डर,
ग्राईंडर, वाहनांचे आवाज,फटाक्यांचे आवाज
यामुळे ध्वनिप्रदूषण होऊ शकतं.
प्रचंड तीव्रतेच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो.
हे सर्वप्रथम १७८२ साली लक्षात आलं.
फाॅर्मिडेबल ह्या युद्धनौकेवरून ८० तोफा
डागल्यावर जहाजावरील लोकांना बहिरेपणा
आला होता. ध्वनीची तीव्रता डेसीबल ह्या
एककामध्ये मोजली जाते. आंतरराष्ट्रीय
मानकानुसार ध्वनीची तीव्रता ४५ डेसीबेलपेक्षा
कमी असणं आवश्यक आहे. पण मोठ्या
शहरांमधून कधीच ही तीव्रता ५० डेसीबेलपेक्षा
कमी नसते.
ध्वनिप्रदूषणामुळे श्रवणक्षमता, मेंदू ,यकृत
आणि हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम
होतात.१८० डेसीबेलपेक्षा जास्त तीव्रतेचा
ध्वनी सतत कानावर पडल्यास मृत्यूसुध्दा
येऊ शकतो. सर्व प्रकारच्या प्रदूषणांच्या
तुलनेत ध्वनिप्रदूषण रोखणं सोपे आहे. पण
यासाठी ध्वनिप्रदूषणाविषयी समाजात
जागरूकता असणं आवश्यक आहे.
घरातल्या, कारखान्यांमधल्या उपकरणांची,
वाहनांची वेळोवेळी देखभाल करणं आवश्यक
आहे. कमीतकमी तीव्रतेचा ध्वनी निर्माण
होईल,याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
विशेष करून दिवाळीच्या सणासुदीला
जास्त आवाजाच्या फटाक्यांचा वापर टाळायला
हवा.
!! जय पर्यावरण --जय वसुंधरा !!
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प. प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment