(१) काजवा --
--- काजवा हा एक कीटक आहे. त्याच्या शरीरात
रासायनिक प्रक्रियेने प्रकाश उत्पन्न केला जातो.
रात्रीच्या अंधारात काजवा लुकलुकतो. हा झाडी
झुडपामध्ये राहणारा कीटक असून तो रात्रीच्या
वेळी इकडून तिकडे उडतो. काजव्याच्या शरीराचे
कप्पे पडलेले असतात. त्याच्या पोटात सहाव्या व
सातव्या कप्प्यामधून हिरवट पांढऱ्या रंगाचा प्रकाश
बाहेर पडतो. रात्रीच्या वेळी काजवे चमकू लागले की
त्याचे दुष्य मोहक दिसते.
-----------------------------------------------------------
(२) फुलपाखरू --
-- फुलपाखरू हे रंगीबेरंगी रंगाचे असते. फुलपाखरू
हे एक विकसित कीटक आहे. त्याच्या वाढीच्या
अंडी, अळी, कोश व फुलपाखरू अश्या अवस्था
आहेत. फुलपाखरू हे अत्यंत नाजूक असते. त्याच्या
चवग्रंथी ह्या त्यांच्या पायामध्ये असतात. म्हणजे
तो फुलावर बसला तरी त्याला त्या फुलाची चव
कळते.
-----------------------------------------------------------
(३) खेकडा --
-- खेकडा हा उभयचर प्राणी आहे. जगामध्ये
खेकड्याच्या ४००० पेक्षा जास्त जाती आहेत.
या प्राण्याला कणा नसतो. त्याला मान आणि
डोकेही नसते. त्याला ८ पाय व संरक्षणासाठी नांग्या
असतात. खेकड्याच्या नांग्या तुटल्या तरी त्या काही
काळाने पुन्हा उगवतात. त्याच्या पाठीवर कठीण
आवरण असते.
===============================
संकलन :- श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment