माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 6 September 2019

सामान्य कारणे सांगा पाहू  !

 
(१) पक्षी असूनही बदकाला पाण्यात कसे
      पोहता येते  ?

---  बदकाच्या पायांची बोटे त्वचेच्या पातळ
पडद्याने एकमेकांना जोडलेली असतात.
या पडद्याचा वल्हयासारखा उपयोग करून
बदक पाण्यात पोहते.
--------------------------------------------------

(२) नदीच्या पात्रातील दगड गोल आणि
     गुळगुळीत कसे बनतात  ?

---  नदीच्या पात्रातून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे
नदीच्या खडबडीत दगडांच्या कंगो-यांची सतत
झीज होत राहते. यामुळे ते गोल आणि गुळगुळीत
होतात.
------------------------------------------------------

(३) भुयारात जाताना उजेडासाठी मेणबत्ती नेऊ
     नये, असा सल्ला का दिला जातो  ?

--- भुयारातील हवेचा बाहेरील हवेशी फारसा
संबंध राहत नाही. अशा ठिकाणी उजेडासाठी
मेणबत्ती नेल्यास ज्वलनासाठी भुयारातील मर्यादित
आॅक्सिजन वापरला गेल्याने मेणबत्ती धारण करणारा
माणूस गुदमरण्याची शक्यता असते. म्हणून त्याला
मेणबत्ती वापरू नये असा सल्ला दिला जातो;
म्हणून भुयारात मेणबत्ती ऐवजी विजेरी (बॅटरी )
वापरणे योग्य ठरते.
---------------------------------------------------------

(४) गोगलगायला हात लावताच ती कोणता
      प्रतिसाद देते  ?
---  गोगलगायला हात लावताच ती पाठीवरील
घरात म्हणजे शंखात आपले शरीर आक्रसून घेते.
हा एक संरक्षणात्मक प्रतिसाद आहे.

============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
            पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
            ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment