माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 25 September 2019

आपले गणित -- वेळेचे हिशेब

(१) शाळा सकाळी  ७: ३० वाजता भरते आणि दुपारी  १: ३० सुटते ; तर शाळा किती वेळ चालते  ?

---  ६ तास
--------------------------------------------------

(२) मुंबईहून एक रेल्वेगाडी सकाळी ६ वाजता निघते आणि पुण्याला १० वाजता पोहोचते; तर त्या गाडीला पुण्याला पोहोचण्यास किती वेळ लागतो  ?

---  ४ तास
--------------------------------------------------

(३) दुपारी  २ वाजून  १५ मिनिटांनी सुरू होणारा सिनेमा सायंकाळी  ५ वाजून ३० मिनिटांनी संपतो; तर तो सिनेमा किती वेळ सुरू असतो  ?

---   ३ तास  १५ मिनिटे
--------------------------------------------------

(४)सुमित सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी वर्तमानपत्रे विकण्यास सुरूवात करतो आणि ते काम ९ वाजून  ५० मिनिटांनी संपते;  तर वर्तमानपत्रे विकण्याचे काम तो किती वेळ करतो  ?

---   ३  तास  २०  मिनिटे
--------------------------------------------------

(५) शंकर सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी गुरे  घेऊन रानात जातो. गुरे चारून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी परत येतो; तर तो किती वेळ गुरे वळतो  ?

--- ६  तास  ४५ मिनिटे

=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
           पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
           ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment