माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 31 October 2019

ऐतिहासिक माहिती - महत्वाच्या व्यक्ती व कार्य

(१)महात्मा फुले
---  मुलींची पहिली शाळा सुरू केली.

(२) ईश्वरचंद्र विद्यासागर
---  विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न.

(३) स्वामी विवेकानंद
--- ' रामकृष्ण मिशन 'ची स्थापना केली.

(४) राजा राममोहन राॅय
---  सतीच्या चालीविरूध्द आंदोलन.

(५) बंकिमचंद्र चटर्जी
---  बंगालमध्ये राजकीय जागृती केली.

(६) आगाखाना
---  मुस्लिम लीग संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेणारे धर्मगुरू.

(७)महात्मा गांधी
---  भारतीय स्वातंत्र्य चळवळ  या लढ्यांचे नेतृत्व
केले.

    
(८) जनरल डायर
---  जलियनवाला बागेतील नि:शस्त्र लोकांवर
      बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला.

(९) लाला लजपतराय
---  सायमन कमिशनविरोधी निदर्शनाच्या वेळी
     झालेल्या लाठीहल्ल्यात जखमी होऊन पुढे त्यातच त्यांचे  निधन झाले.

(१०) सुभाषचंद्र बोस
---  संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा नेता.
     आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले.

(११) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
---  भारतीय संविधानचे शिल्पकार.

(१२) डाॅ. मुहम्मद इक्बाल
---   स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला.

(१३) चौधरी रहमत अली
---   पाकिस्तान निर्मितीची कल्पना मांडली.

(१४) बॅ. मुहम्मद अली जीना
---   द्वीराष्ट्र  सिध्दांत मांडून स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राची मागणी केली.

(१५)वल्लभभाई पटेल
---   संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मार्गी  लावला.

(१६) डाॅ. राममनोहर लोहिया
---   गोवामुक्तीसाठी सत्याग्रह केला.

(१७) पंडित जवाहरलाल नेहरू
---   संविधान सभेचे अध्यक्ष. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.

(१८) वासुदेव बळवंत फडके
---   महाराष्ट्रात  रामोश्यांना संघटित करून
      इंग्रजांविरूद्ध सशस्त्र उठाव केला.

(१९) शिरीषकुमार
---  नंदुरबार येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबारात हुतात्मा झाला.

(२०)सरोजिनी नायडू
--- दांडीयात्रेत सहभाग, धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.

(२१) सावित्रीबाई फुले
---   समाजाचा रोष पत्करून मुलींना  शाळेत शिकवण्याचे काम केले.
============================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
                ९४२२७३६७७५

Wednesday, 30 October 2019

विषय -- गणित ( शाब्दिक उदाहरणे )

(१) कोणत्या संख्येतून ३९२५ वजा केल्यास बाकी १०७५ उरेल  ?
.........................

(२) पावणे नऊशेमध्ये किती मिळवले, म्हणजे एक
      हजार रुपये होतील  ?
.........................

(३) ५५५५ मधून १५५५ वजा केल्यास बाकी किती उरेल  ?
..........................

(४) १०००० पेक्षा ९९९० ही संख्या कितीने लहान आहे  ?
..........................

(५)  पावणेदोन हजारमध्ये एक मिळवला तर बेरीज किती येईल  ?
.........................

(६) गुण्य  २०० आणि गुणक  ५० असेल, तर गुणाकार किती  ?
..........................

(७)गुणाकार  ८१ असून  गुण्य ९ असेल तर गुणक किती  ?
...........................

(८) ३०००  आणि  १० यांचा गुणाकार किती  ?
............................

(९) १० दशक  आणि २ दशक यांचा गुणाकार किती  ?
............................

(१०) नऊशे नव्याण्णव या संख्येला नऊने भागले, तर भागाकार किती येईल  ?
.............................

(११) ७७७८ या संख्येला कितीने भागले असता बाकी १ उरेल  ?
.............................

(१२) ८६४२ ला  २ ने भागले असता भागाकार किती  ?
............................

(१३) ४४४५ ला  ४ ने भागले असता बाकी किती  ?
............................

(१४)  ३६० आंबे म्हणजे किती डझन आंबे  ?
............................

(१५) एकच संख्या  ९ वेळा घेऊन बेरीज केली
     तेव्हा ती  ८१ आली, तर ती संख्या कोणती ?
............................

(१६) २० जणांच्या रेल्वे तिकिटांसाठी ८००० रुपये
        द्यावे लागले, तर एका तिकिटाचा दर सांगा.
............................

(१७) १०० रूपयांचे बिल देण्यासाठी ५ रूपयांच्या
        किती नोटा द्याव्या लागतील  ?
............................

        
============================
उत्तरे --
(१) ५००० ,  (२) १२५ ,  (३)  ४०००
(४) १० ,     (५) १७५१ , (६) १०,००० (७) ९
 (८) ३०,००० , (९) २००० (१०) १११
(११)  ७ , (१२)  ४३२१ , (१३)  १ ,  (१४) ३०
(१५) ९ , (१६) ४००, (१७) २०
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Monday, 28 October 2019

संस्कृत शब्दाचे मराठीत रूपांत होणारा बदल


  संस्कृत शब्द            मराठीत शब्द

(१)   कर्ण               --   कान

(२)   चक्र                --  चाक

(३)  अग्नि                --  आग

(४)  पर्ण                  --   पान

(५)  विनति              --    विनंती

(६)  गृह                   --    घर

(७)  पाद                   --    पाय

(८)  भ्रातृ                  --    भाऊ

(९)  ग्राम                  --     गाव

(१०) दुग्ध                 --    दूध

(११)  कोमल             --    कोवळा

(१२)  ओष्ठ                --    ओठ

(१३)  कर्म                 --    काम

(१४)  घर्म                 --     घाम
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ¤ ९४२२७३६७७५ ¤

Sunday, 27 October 2019

आझाद हिंद सेना (सामान्यज्ञान )

(१)आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
---  रासबिहारी बोस

(२) आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले  ?
---  सुभाषचंद्र बोस

(३)आझाद हिंद सेनेचे निशाण कोणते होते  ?
---  तिरंगा ध्वज

(४)आझाद हिंद सेनेचे अभिवादनाचे शब्द कोणते ?
---  जय हिंद

(५) आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य कोणते  ?
---  चलो दिल्ली

(६) आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते होते ?
---  कदम कदम बढाये जा.

(७) सुभाषचंद्र बोस यांचे निधन कधी झाले  ?
---  १८ आॅगस्ट १९४५

(८) 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा '
       असे कोणी म्हटले आहे  ?
---  सुभाषचंद्र बोस

(९)आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली ?
---  सुभाषचंद्र बोस

(१०)आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली ?
---   सिंगापूर
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
             ९४२२७३६७७५

आदिवासी समाजात दिवाळी सणाचे महत्त्व

आदिवासी मित्रानो,
    आदिवासी परंपरेत सर्वात मोठा मानल्या
गेलेल्या दिवाळी सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक
शुभेच्छा  ! दिवाळी म्हटलं की आदिवासी
बांधवांनी म्हटलेले गाणं आवर्जून आठवतं .
   दिन दिन दिवाळी, गायी, म्हशी ओवाळी
   गायी म्हशी कुणाच्या, रावणाच्या
   रावण  कुणाचा, आईबापाचा
   दे माई खोब-याची वाटी
   वाघाच्या पाठीत हाणेन काठी

    आपली आदिवासी संस्कृती ही निसर्गपूजक
असल्यामुळे या सणाचे निसर्ग व आदिवासी
माणसाचे अतूट नाते आहे. वरील गाण्यामधूनही
तेच दिसते. गायी - म्हशी ही आदिवासींची खरी
दौलत, म्हणूनच  या गाण्यात त्यांना प्रमाने
ओवाळले आहे. त्यांना ज्याच्यापासून भीती
वाटते. त्यात वाघोबाच्या पाठीत काठी
घालण्याचा बेतपण आला आहे.
   आदिवासी समाज हा वाघदेव,  नागदेव,
डोग-यादेव यांचे पूजन करतो. आणि त्यांना
देवसुध्दा मानतो. सण,  समारंभ, उत्सव हे
आपल्या आयुष्याला नवी उभारी देत असतात.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात
थोडीशी का असेना उसंत मिळावी, आपला
बहुतांश वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत जावा,
आप्तस्वकीय गाठीभेटी व्हाव्यात या उद्देशाने
आदिवासी संस्कृतीत ऋतुमानानुसार सण -
उत्सवांची रचना केली आहे. दिवाळी हा
आदिवासी संस्कृतीचा उत्सव आहे. अंधाराला
दूर सारून प्रकाशाचा संदेश देणारा हा सण
आहे.
  आदिवासी मित्रांनो, दिवाळीच्या आनंदात
अधिक भर घालण्यासाठी पर्यावरणाचा र्‍हास
होणार नाही ; याची काळजी घ्या.कारण
आदिवासी निसर्ग सौंदर्याची पूजा करणारा
आणि आपल्या जीवनात निसर्गाला सर्वोच्च
स्थान देणारा समाज म्हणजे आदिवासी आहे.

 
   लेखक :-- शंकर चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ¤ ९४२२७३६७७५
     

Friday, 25 October 2019

मराठी शब्दाचे विस्तारीत रूपात अर्थ (म्हणजे काय)


(१) दक्षिणायन
--- सूर्याचे दक्षिणेकडे जाणे.

(२) रणगाडा
--- तोफ असलेला गाडा.

(३) स्थानबद्ध
---  एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला.

(४) अजातशत्रू
---  ज्याला शत्रू नाही असा.

(५) ऋणानुबंध
---  पूर्वजन्मीचे लागेबांधे.

(६) अंगाई
--- मुलाला झोपण्यासाठी म्हटलेले गीत.

(७) हटवादी
---  आपल्या मताप्रमाणे चालणारा.

(८) आबालवृद्ध
---  लहानापासून थोरापर्यत.

(९) मनमिळाऊ
--- सर्वांशी मिळून -मिसळून वागणारा.

(१०) समाजकंटक
---  त्रास देणारे समाजातील लोक.

(११) यथाशक्ती
---    शक्य असेल त्याप्रमाणे.

(१२) सुखलोलुप
---   सुखाच्या मागे लागलेला.

(१३) लखपती
---  लाखो रुपये जवळ असलेले.

(१४) अल्पसंतुष्ट
---  थोडक्यात समाधान मानणारा.

(१५) कंजूष
---  वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा.
=============================
संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५

Wednesday, 23 October 2019

साधर्म्य  समजावून घेऊया (ज्या अर्थी /त्या अर्थी )


  सामान्यज्ञान (आपले पर्यावरण )

(१) इंधनाचे ज्वलन = हवा प्रदूषके  : :
     कारखान्याचे खराब पाणी = जल प्रदूषक

(२) जंगले  = आॅक्सिजन चक्र  : :
     महासागर  = कार्बन चक्र

(३) जंगल रहिवासी = जळाऊ लाकूड
      गुराखी  = चराईचे कुरण

(४) ध्वनी प्रदूषण  = उच्च रक्तदाब  : :
     धुरके  = श्वसनरोग

(५)  जंगल = नैसर्गिक साधनसंपत्ती  : :
      वस्ती  = मानवनिर्मित

(६) पवन ऊर्जा  = वारा  : : 
     सौरऊर्जा   = सूर्य

(७) ध्वनी प्रदूषण  = बहिरेपणा  : :
     स्वयंपाकातील धूर = श्वसनरोग

(८) सांडपाणी  = जलप्रदूषण  : :
  घनकचरा(प्लास्टिक)= भूमी/मृदा प्रदूषण

(९) वायू प्रदूषण = वाहनांतून निघणारा धूर : :
     जल प्रदूषण = निर्माल्य पाण्यात टाकणे.

(१०) स्थायू इंधन  = दगडी कोळसा  : :
       द्रव इंधन  = पेट्रोल

(११) वायू इंधन  = बायोगॅस  : :
        जीवाश्म इंधन  = आॅइल
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
            पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            मो. नं. ९४२२७३६७७५

Tuesday, 22 October 2019

आदिवासी जंगलसंवर्धनाचे महत्व समजतो.


   ब्रिटिश अमलापूर्वी जंगलांबाबत गावसमुदाय
निर्णय घ्यायचे. स्थानिक आदिवासी रोजच्या गरजांसाठी जंगलांचा वापर करू शकत. पण ब्रिटिश राजवटीत जंगलांबाबत गावसमुदायचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवर गावसमुदाय निर्णय घेऊ शकत नसत. यामुळे जंगलांबद्दलचा आपलेपणा कमी झाला. गावाबाहेरील लोक स्थानिक साधन-संपत्तीचा अतिरेकी वापर करू लागले. त्यामुळे साधनसंपत्तीचा र्‍हास झाला.
   स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली. जंगले ही केंद्र व राज्य सरकारच्या मालकीची झाली. आदिवासी
लोकांनी चळवळी करून गावाजवळच्या जंगलांचे
रक्षण करण्याची जबाबदारी घेतली. या चळवळीचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रम सुरू केला. वनविभाग आणि गावकरी मिळून जंगलांचे संवर्धन व व्यवस्थापन करू लागले.
   महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ातील श्री. चैत्राम पवार (आदिवासी सेवक ) यांच्या प्रयत्नाने साकार झालेले बारीपाडा हे याचे उत्तम उदाहरण आहे.
    बारीपाडा गावाने लोकांसाठी जंगल वापरायचे
नियम बनवले. नियम मोडणाऱ्यांवर दंड बसवण्यात आले. जंगल व्यवस्थापनान करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. हजारो हेक्टर जंगलांचे संवर्धन गाव करू लागला.
   स्थानिक प्रशासन आणि निर्णय व्यवस्थाच जंगल संवर्धनाचा पाया ठरली. सर्व निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेतले जातात. त्यामुळे जंगलांचे संवर्धन झाले. याठिकाणी दरवर्षी रानभाजी स्पर्धा घेतली जाते आणि येथे आदिवासी महिला मोठय़ा संख्येने भाग घेत असतात. तसेच याठिकाणी जंगल संवर्धनाचा अभ्यास करण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात.
        त्यामुळे आदिवासी लोकसमुदायांचे जंगलसंवर्धनाच्या प्रयत्नामध्ये स्थानिक निर्णय प्रक्रिया खूप महत्वाची असते.
   यावरून असे समजते की आदिवासी माणूस जंगल संवर्धनाचे महत्त्व समजतो.

  लेखन :- शंकर चौरे ( प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ,धुळे
             मोबाईल नं. -- ९४२२७३६७७५

Friday, 18 October 2019

मानवी शरीराविषयी थोडक्यात व्याख्या 

(१)आंतरेद्रिये  :-
--- शरीराच्या आतील भागात असणाऱ्या इंद्रियांना आंतरिंद्रये म्हणतात.
--------------------------------------------------

(२) रक्तवाहिन्या  :-
---  आपल्या शरीरात नलिकांमधून रक्त पुढे पुढे जात असते. या नलिकांना रक्तवाहिन्या म्हणतात.
--------------------------------------------------

(३) रक्ताभिसरण  :-
---  रक्तवाहिन्यांमधून रक्ताची ह्रदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि तेथून परत हृदयाकडे अशी ने - आण सतत सुरू असते, याला रक्ताभिसरण म्हणतात.
--------------------------------------------------

(४)केशवाहिन्या  :-
---  केसांसारख्या अतिशय लहान रक्तवाहिन्यांना केशवाहिन्या म्हणतात.
--------------------------------------------------

(५) श्वास  :-
---  श्वास घेणे म्हणजे नाकाने बाहेरील हवा फुप्फुसांत घेणे.
--------------------------------------------------

(६) उच्छ्वास  :-
--- फुप्फुसांतील हवा नाकावाटे बाहेर सोडणे या क्रियेला उच्छ्वास म्हणतात.
--------------------------------------------------

(७) श्वासोच्छवास :-
---  श्वास घेणे आणि श्वास सोडणे या एकापाठोपाठ होणाऱ्या दोन क्रियांना श्वासोच्छवास म्हणतात.
--------------------------------------------------

(८) श्वसन  :--
---  हवेतील आॅक्सिजन शरीरात घेणे व शरीरातील कार्बनडायआॅक्साइड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.
--------------------------------------------------

(९) श्वासनलिका :--
-- श्वासाबरोबर  आत घेतलेली हवा फुप्फुसांपर्यत
पोहोचवण्यासाठी असणाऱ्या नळीला श्वासनलिका म्हणतात.
 -------------------------------------------------

(१०) ज्ञानेंद्रिये  :-
--- आपल्याला निरनिराळ्या गोष्टींचे ज्ञान देणाऱ्या,माहिती देणाऱ्या शरीराच्या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात.  डोळे,  कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत.
--------------------------------------------------

(११) अन्नपचन  :-
---  खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत
 होऊन ते नंतर रक्ततात मिसळणे या क्रियेला अन्नपचन म्हणतात.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (धुळे )
            पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ९४२२७३६७७५

Thursday, 17 October 2019

गणितीय प्रश्नावली  (अंकगणित )


(१) एका व्यक्तिला पाण्याच्या १० टाक्या भरण्यास
  ५ तास लागतात. तर अशा ३० टाक्या भरण्यास
  किती तास लागतील  ?
--- १५  तास
--------------------------------------------------
(२) एक माणूस एक भिंत बांधायला बारा दिवस
    घेतो, दोन माणसांना तशाच प्रकारची तेवढीच
    भिंत बांधायला किती दिवस लागतील  ?
---  ६  दिवस
--------------------------------------------------
(३) जे काम ८ मजूर १६ दिवसात संपवतात, तशाच
    प्रकारचे तेवढेच काम  ८ दिवसांत संपवण्यासाठी  
    किती मजूर लागतील  ?
---  १६  मजूर
--------------------------------------------------
(४) ५ पाने लिहिण्यास  ३० मिनिटे लागली तर
      १५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल  ?
---  १  तास ३० मिनिटे
--------------------------------------------------
(५)  १० पुस्तके घेण्यासाठी २०० रूपये लागतात.
       तर ५० पुस्तके घेण्यासाठी किती रुपये
       लागतील  ?
---  १००० रूपये
--------------------------------------------------
(६) १५ विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च  १५०० रुपये
      आहे,  तर ३० विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च
      किती रूपये येईल  ?
---  ३००० रूपये
--------------------------------------------------
(७) एका फूलवाल्याने  ५०० रूपयांची फुले
     आणली, त्या  फुलांचा हार करून विकले.
     तेव्हा त्याला ७६० रुपये मिळाले, तर त्याला
     किती रूपये नफा  मिळाला  ?
---  २६० रूपये नफा झाला.
--------------------------------------------------
(८) एका फळविक्रेत्याने  ४२४० रुपयांना घेतलेली
      केळी ४०४० रुपयांना विकावी लागली,तर
      त्याला किती तोटा झाला  ?
---  २०० रूपये तोटा झाला.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Wednesday, 16 October 2019

आम्हांला ओळखा  (भौगोलिक माहीती )

(१ ) साखर उद्योगास लागणारा कच्चा माल

---  ऊस

---------------------------------------------------
(२) कापड उद्योगास लागणारा कच्चा माल

--- कापूस

---------------------------------------------------
(३) तेलगिरण्यांसाठी लागणारा कच्चा माल .

--- गळिताची धान्ये  (उदा.  भुईमूग )

---------------------------------------------------
(४) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती

---  जिरायती शेती

---------------------------------------------------
(५)जलसिंचनाचा पाणीपुरवठा करून केली जाणारी
शेती

---  बागायती शेती
---------------------------------------------------
(६) हिवाळ्यातील हंगामात घेतली जाणारी शेती

--- रबी हंगाम

---------------------------------------------------
(७) पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम.

---  खरीप हंगाम

---------------------------------------------------
(८) विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून
       करण्यात येणारी शेती.

---  आधुनिक शेती.

---------------------------------------------------
(९) सूर्यापासून मिळणारी ऊर्जा.
---  सौरऊर्जा

---------------------------------------------------
(१०) वा-याच्या वेगाचा वापर करून निर्माण केलेली
ऊर्जा.

---  पवनऊर्जा.

============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
             ९४२२७३६७७५  पिंपळनेर
         

Sunday, 13 October 2019

सामान्यज्ञान -- जोड्या

● थोर व्यक्तींची संबोधने :--

(१) जोतिबा फुले  -- महात्मा

(२) जवाहरलाल नेहरू -- पंडित,  चाचा

(३) वल्लभभाई पटेल -- सरदार, लोहपुरूष

(४) सुभाषचंद्र बोस -- नेताजी

(५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर -- भारतीय राज्यघटनेचे  शिल्पकार

(६) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता
=============================

● लेखक - कवी व त्यांची टोपणनावे :--

(७) राम गणेश गडकरी -- गोविंदाग्रज

(८) प्रल्हाद केशव अत्रे -- केशवकुमार

(९)विष्णू वामन शिरवाडकर -- कुसुमाग्रज

(१०) नारायण सूर्याजी ठोसर -- संत रामदास

(११) मुरलीधर नारायण गुप्ते --  बी

(१२) कृष्णाजी केशव दामले -- केशवसुत
============================

● सुप्रसिद्ध व्यक्ती  :--

(१) डाॅ. अब्दुल कलाम -- शास्त्रज्ञ

(२) लता मंगेशकर -- गायिका

(३) डाॅ. जयंत नारळीकर -- शास्त्रज्ञ

(४) अण्णा हजारे -- ज्येष्ठ समाजसेवक

(५) झाकिर हुसेन -- तबलावादक

(६) मिल्खा सिंग -- धावपटू

(७) रतन टाटा  -- उद्योजक

(८) मुकेश अंबानी -- उद्योजक

(९) सचिन तेंडुलकर -- क्रिकेटपटू

(१०) अंजली भागवत -- नेमबाज

(११) मेरी कोम -- मुष्टियुद्ध

(१२) पी. टी. उषा -- धावपटू

(१३) अभिनव बिंद्रा -- नेमबाज

(१४) सायना नेहवाल -- बॅडमिंटन

(१५) अमिताभ बच्चन -- अष्टपैलू अभिनेता

(१६) कविता राऊत -- धावपटू

(१७) डाॅ. बाबा आमटे -- कुष्ठरोग निर्मूलन

(१८) पी. टी. उषा -- भारताची सुवर्णकन्या

(१९) कविता राऊत -- सावरपाडा एक्सप्रेस

============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
            पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Saturday, 12 October 2019

सामान्यज्ञान (सामान्य विज्ञान )

(१) एकूण जलसंपत्तीच्या किती टक्के पाणी
     समुद्रात सामावलेले आहे  ?

---  ९७ टक्के
-----------------------------------------------------
(२) समुद्राचे पाणी कसे असते  ?

---  खारट
-----------------------------------------------------
(३) पावसाळ्यात हवा कशी असते  ?

---  दमट
-----------------------------------------------------
(४) शरीराचे तापमान कशाने मोजतात  ?

---  तापमापीने
-----------------------------------------------------
(५) खोबरेल तेल कोणत्या ऋतूत गोठते  ?

---  हिवाळ्यात
-----------------------------------------------------
(६) तापमापीमध्ये सामान्यतः  कोणता पदार्थ
     वापरतात  ?

---  पारा
-----------------------------------------------------
(७) १ लीटर पाण्याचे वस्तुमान किती असते  ?

---  १ किलोग्रॅम
-----------------------------------------------------
(८) बेडकाचे अन्न कोणते  ?

---  कीटक
-----------------------------------------------------
(९)फुलपाखराचे अन्न कोणते  ?

---  मकरंद  (मध )
-----------------------------------------------------
(१०) चर्मवाद्यांमध्ये चामड्याचे कंपन होऊन
        कशाची निर्मिती होते  ?

---  ध्वनी
-----------------------------------------------------
(११)पृथ्वीवर पाणी किती अवस्थांमध्ये आढळते  ?

--- तीन
-----------------------------------------------------
(१२) लाकूड अर्धवट जळल्यावर कोणता पदार्थ
       तयार होतो  ?

---  कोळसा
-----------------------------------------------------
(१३)द्रवाचे बाष्प होणे या क्रियेला काय म्हणतात  ?

---  बाष्पीभवन
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
          ९४२२७३६७७५

वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व

      निरनिराळ्या प्रकारचे रोग विविध
रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे होत असतात.
साथीच्या रोगांच्या वेळी अनेकांना रोगाचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच
संसर्गजन्य आणि संपर्कजन्य रोगांचा प्रसारही सूक्ष्मजीवांमार्फत होत असतो. विविध जीवाणू
आणि विषाणू , अस्वच्छ परिसर, दूषित पाणी
आणि वाईट सवयीमुळे साथीचे रोग पसरत
असतात.  उदाहरणार्थ, उघड्यावर थुंकणे,
शौच किंवा लघवी करणे यांमुळे परिसरात
रोगजंतूंचा पैलाव होतो. क्षयरोगाचे जीवाणू ,
रोग्याच्या धुंकीतून हवेत शिरकाव करतात.
अशी दूषित हवा इतर निरोगी माणसांना
क्षयरोगी बनवू शकते. उघडे अन्न, बाजारी
अन्नपदार्थ यांवर बसलेल्या घरमाश्या विषमज्वर, काॅलरा, अतिसार, हगवण, कावीळ अशांसारख्या विकारांना जलद गतीने पसरवतात. या सर्व
रोगराईला टाळायचे असेल तर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येकाने लक्षात
घेतले पाहिजे.
            स्वच्छता राखण्याचे उपाय केल्यास
रोगराईला प्रतिबंध होऊ शकतो. यासाठीच
प्रत्येकाने वैयक्तिक आणि सार्वजनिक
स्वच्छतेबद्दल सजग राहिले पाहिजे. कोठेही उघड्यावर न थुंकणे व उघड्यावर मलमूत्रविसर्जन
न करणे, कचरा न फेकणे अशा वैयक्तिक
स्वच्छतेच्या बाबी पाळणे महत्त्वाचे आहे.
             तसेच अन्न कोठेही उघडे न ठेवणे,
भाजीपाला स्वच्छ धुणे,,पाणी व उकिरडा
साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आजारी
असल्यास सार्वजनिक ठिकाणी न जाणे अशा उपायांनी रोगराईला आळा बसेल. म्हणूनच
उत्तम आरोग्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक
स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.

=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Thursday, 10 October 2019

शब्दांची वैज्ञानिक अर्थात व्याप्ती (भाग - ३)

(१) निर्धोक
---   ज्यापासून धोका नाही असे.

(२) नैसर्गिक
---  निसर्गत:  मिळणारे.

(३) भूगर्भ
---  जमिनीच्या आतील भाग.

(४) मानवनिर्मित
---  माणसाने निर्माण केलेली.

(५) मिठागर
--- समुद्रकाठावरची मीठ तयार करण्याची जागा.

(६) श्वासनलिका
---  फुप्फुसांत हवा जाण्यासाठीची नळी.

(७) जलशुद्धीकरण
---  पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया.

(८) निर्जंतुकीकरण
---  जंतूचा नाश करण्याची प्रक्रिया.

(९) उष्माघात
--  सूर्याच्या उष्णतेने  शरीरावर होणारा दुष्परिणाम.

(१०) चुंबकीय पदार्थ
---   चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ.

(११) सौरऊर्जा
---   सूर्यापासून मिळणारी ऊर्जा.

(१२) रोगजंतू
---    रोगास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव.

(१३) कुपोषण
---    अन्नाची किंवा अन्नघटकांची कमतरता.

(१४) जैविक
---    जीव असलेले,  जीवविषयक.

(१५) अजैविक
---   जीव नसलेले.
=============================
संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               पिंपळनेर  ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५