माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 5 July 2020

ओळखा बरे , मी आहे कोण ?


(१) रात्रंदिवस मी सीमेवर उभा असतो.
देश माझा धर्म असतो.
दुसरे माझे कर्म नाही.
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?'
---------------------------------------

(२) सर्दी खोकला तुम्हा येता ,
तुम्ही माझ्याकडे धावत येता.
मी तुम्हांस बरे करतो.
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ? '
-------------------------------------------

(३) झुकझुक मी धावत असते
'पों पों मी आवाज करते.
तुम्हा तुमच्या गावा नेते
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?'
-------------------------------------------------

(४) इवले इवले माझे डोळे
इकडून तिकडे माझे पळणे
पाण्यावाचून नाही जीवन माझे
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?
-------------------------------------------------

(५) तुम्ही दिवसभर कोठे ही जा.
संध्याकाळ झाली की तुम्ही माझ्याकडे येता.
ऊन, पाऊस व वारा यांपासून मी तुमचे रक्षण करतो.
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?
----------------------------------------------------------------
उत्तरे :- १) सैनिक, (२) डाॅक्टर, (३) आगगाडी, (४) मासा, (५) घर
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment