ब्लॉग भेटी.
Monday, 19 April 2021
म्हणजे काय ? ( भाषिक सामान्यज्ञान )
(१) ' टाकसाळ ' म्हणजे काय ?
उत्तर -- नाणी बनविण्याचा कारखाना.
(२) ' वैमानिक ' म्हणजे काय ?
उत्तर -- विमान चालवणारा.
(३) ' अतिवृष्टी ' म्हणजे काय ?
उत्तर -- खूप पाऊस पडणे.
(४) ' कारागृह ' म्हणजे काय ?
उत्तर -- कैदी ठेवण्याची जागा.
(५) ' दानशूर ' म्हणजे काय ?
उत्तर -- खूप दानधर्म करणारा.
(६) 'पाणबुडी ' म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्याखालून चालणारी बोट.
(७) ' वाटाघाटी ' म्हणजे काय ?
उत्तर -- मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी.
(८) 'वखार ' म्हणजे काय ?
उत्तर -- धान्य साठवण्याची बंदिस्त जागा.
(९) ' वासा ' म्हणजे काय ?
उत्तर -- घराच्या छताला आधार देणारे लाकूड.
(१०) ' बेवारशी ' म्हणजे काय ?
उत्तर -- वारस नसलेला.
(११) ' मितभाषी ' म्हणजे काय ?
उत्तर -- मोजकेच बोलणारा.
(१२) ' धर्मातर ' म्हणजे काय ?
उत्तर -- एका धर्मातून दुस-या धर्मात जाणे.
(१३) ' जन्मभूमी ' म्हणजे काय ?
उत्तर -- जेथे जन्म झाला ती भूमी.
(१४) ' आदिवासी ' म्हणजे काय ?
उत्तर -- अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ निवासी.
(१५) ' दंतकथा ' म्हणजे काय ?
उत्तर -- तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट.
(१६) ' साक्षर ' म्हणजे काय ?
उत्तर -- लिहिता - वाचता येणारा.
(१७) ' निरक्षर ' म्हणजे काय ?
उत्तर -- लिहिता - वाचता न येणारा.
(१८) ' असंख्य ' म्हणजे काय ?
उत्तर -- मोजता येणार नाही असे.
(१९) पूर्वाभिमुख ' म्हणजे काय ?
उत्तर -- पूर्वेकडे तोंड करून असलेला .
(२०) ' वाटाड्या ' म्हणजे काय ?
उत्तर -- वाट दाखवणारा.
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment