(१) कोळी या किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
(२) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
(३) ' खजूर '' या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक
(४) फांद्या नसलेल्या एका वनस्पतीचे नाव सांगा ?
उत्तर -- नारळ
(५) घरटी न बांधणा-या एका पक्ष्याचे नाव सांगा ?
उत्तर -- कोंबडी
(६) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर --- कोळी
(७) सोंड असलेला प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती
(८) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- कुत्रा
(९) शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- बैल
(१०) पाय नसणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- साप
(११) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वटवाघूळ
(१२) सहा पाय असणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- झुरळ
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५