संकलक:- शंकर चौरे,(पिंपळनेर) धुळे.
🌎उच्चारातील फरक ओळखू या🌏
🔹लेखन आणि वाचन यात आढळून येणा-या भाषिक चुका ज्या त्या वेळीच दुरूस्त करून घ्याव्यात.खाली काही उपयुक्त माहिती आपण पाहू .
⭐ 'न' आणि 'ण' / 'श' आणि 'ष' यांच्या उच्चारात मूलभूत सूक्ष्म फरक आहे.
यांतील काही अक्षरांचा दाताच्या मुळाशी जिभेचा स्पर्श होऊन केला जातो,तर काहींच्या उच्चाराच्यावेळी टाळुच्या मधल्या भागास जिभेचा स्पर्श होतो.
हा उच्चारभेद आपण पुढील शब्द वाचून -बोलून समजावून घेऊया .
१)'न' आणि 'ण' बाबत ~
🔅 'न' चा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दाताच्या मुळाशी होतो.
नळ , नभ , नख , नस , नग, नट ,नरम ,नवस ,नजर , नाक , नाग , नाटक , नाना , नापास .
🔅 'ण' चा उच्चार करताना जीभ मागे वळून टाळूच्या मागील भागास स्पर्श करते.
खण , पण , सण , बाण , आण , धरण, वरण , हरण , पाणी , मटण माणूस , शेण .
२) 'श' आणि 'ष ' बाबत ~
🔅 'श' चा उच्चार करताना टाळुच्या मधल्या भागास जिभेचा स्पर्श होतो.
शरद , शहर , शरम , शरण , शहाणा , शाळा.
🔅'ष' चा उच्चार करताना टाळुच्या मागच्या भागास जिभेचा स्पर्श होतो.
षटकार , षटकोन , पुरुष , औषध , ऋषी , घोष , कोष , वेष .
संकलक :-
शंकर चौरे.(प्रा.शि)
पिंपळनेर ता. साक्री(धुळे)
9422736775
No comments:
Post a Comment