माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 4 February 2017

शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रम

    ☄ शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रम☄

         ➖➖➖➖➖➖➖➖➖

संकल्पना :- शंकर चौरे  (पिंपळनेर)धुळे

        ➖➖➖➖➖➖➖➖➖
अध्ययन -अध्यापनात रंजकता आणण्यासाठी टाकाऊतून कलात्मक स्प्रे पेंटिंग करून शैक्षणिक
साहित्य निर्मिती करणे.
   
🔴स्प्रे पेंटिंगद्वारे शैक्षणिक साहित्य तयार करण्याची कृती थोडक्यात पुढील प्रमाणे.                           🔅साहित्य :---
     कार्डशीट,    चाळण,    टूथब्रश,   शाई/रंग,   विविध  प्रकारच्या  टाकाऊ वस्तू,     चित्रांची कात्रणे, अक्षरे  -शब्द यांचे  आकाराची कात्रणे ,झाडांची पाने -फूले इ.

⚜कृती :--
    (१) प्रथम कार्डशीटवर आपल्या आवश्यकतेनुसार चित्रांची कात्रणे   व वस्तूंची मांडणी   करून घ्यावी.        

  (२)चाळण कार्डशीटवर  अवगत धरावी.                     (३)रंग  ताटलीमध्ये  पातळ  करून  टूथब्रश      रंगामध्ये बुडवावा.

(४)टूथब्रश रंगात बुडवून हलक्या हाताने       चाळणवर  पुन्हा -पुन्हा घासावे.
(५)रंगाचे फवारे कार्डशीटवर सर्व भागांवर      उडतील;अशा पध्दतीने टूथब्रश घासत रहावे.
(६) अशा पध्दतीने रंगाचे फवारे संपूर्ण           कार्डशीटवर उडलेली दिसल्यावर कार्डशीटवरील ठेवलेल्या    वस्तू  किंवा कात्रणे हलक्या हाताने काढून घ्यावे.    
             कार्डशीटवर सुरेख सौंदर्यकृती उमटलेली
     आपल्याला दिसेल.
      अशा रीतीने   विद्यार्थ्यांच्या सहभागातून शैक्षणिक
      साहित्य निर्मिती सहज व सोप्या पद्धतीने करता येईल.

➡  या उपक्रमातून पुढील बाबी साध्य झाल्या.
       1.अल्प खर्चात   शैक्षणिक      साहित्य निर्मिती होते.
        2.या उपक्रमामुळे मुलांना स्वत : सहभागी
  होण्याचा   व  नवनिर्मितचा आनंद मिळतो.
     

       अशा प्रकारे बाजारातील महागडे शैक्षणिक
     साहित्य आणण्यापेक्षा टाकाऊ वस्तुंपासून
    स्वत: हाताने तयार केलेल्या साहित्याचा वापर
     वर्गात अध्यापनात करता येईल.
          
             📝  संकल्पना :--
                    शंकर  चौरे  (प्रा. शिक्षक )
                     ता.साक्री जि. धुळे
          📱 ९४२२७३६७७५
         🔵'शंकर चौरे' यांची सदर कला दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'कला कौशल्य '
कार्यक्रमात प्रसारित झाली आहे.
  

No comments:

Post a Comment