* उपक्रम *
🔹 ओळखा पाहू, मी कोण 🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
(१) तुम्ही माझ्याशिवाय जगू शकत नाही
पण मी तुम्हाला डोळ्यांना दिसत नाही
----- हवा
(२) कडू आहे, गोड आहे की आहे आंबट
मी सहज सांगेन की आहे ते तिखट
---- जीभ
(३) इटुकल पिटुकलं दाराला लटकलं
चावी शिरता पोटात, पटकन उघडलं
----- कुलूप
(४) एका पासून बारा इतकी असते याची धाव
भिंतीवरती, हाती शोभे आठवते का नाव ?
------ घड्याळ
(५)झाडावरती उंच ठिकाणी,पोटामध्ये मधूर पाणी
कोकण माझे गाव, शुभकार्याला देती भाव
------- नारळ
(६) अंगावर पट्टे अन् उंचच माझी मान
झाडाच्या शेंड्यांची मी पाने खातो छान
----- जिराफ
(७) असा सुळकन इकडे -तिकडे पळतो
मी फक्त पाण्यात राहू शकतो
------ मासा
(८) बत्तीस जणांना ठेवते गुपचूप
स्वतः बोलते खूपच खूप
------- जीभ
(९) जमिनीवर-पाण्यात राहतो,टणक माझी पाठ
संकटसमयी अंग मी ओढून घेतो आत
------- कासव
(१०) डोक्यावर तुरा छान,
राष्ट्रीय पक्ष्याचा मला मान
----- मोर
(११) म्हणतात मला फळांचा राजा
खाल्ल्यावर वाटते मज्जाच मज्जा
----- आंबा
(१२) सुपासारखे माझे कान
शेपूट आहे फार लहान
---- हत्ती
(१३)टणक कवच माझे, लाल तरी कधी पिवळे
गुलाबी मधूर मी, रसाळ दाणे आता कोवळे
------ डाळिंब
संकलक :-- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment