🌍पक्ष्यांची ठळक वैशिष्ट्ये 🌍
🔹संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे🔹
(१) मोर :-
डोक्यावर सुरेख तुरा असतो.
(२) गिदाड :-
उघडी बोडकी मान असते.
(३) पाकोळी :-
सडपातळ पंख आणि दुभंगलेली शेपूट.
(४) पाणडुबी :-
पाणडुबी पक्षाला शेपूट नसते.
(५) पाणकावळा :-
पाण्यात बुडी मारून तो माशांचा
पाठलाग करतो.
(६) रंगीत करकोचा :-
करकोच्याची चोच लांबलचक असते.
(७) घार :-
तीक्ष्ण नजर व आकाशात उंच घिरट्या
घालते.
(८) राखी तितर :-
रंग तपकिरी, अंगावर ठिपके, रेघा आणि
पट्टे, शेपूट आखूड असते.
(९) पाणकोंबडी :-
निळसर करड्या रंगाचा हा पाणपक्षी आहे.
(१०) टिटवी :-
डिड यू डू इट ! डिड यू डू इट!
हा टिटवीचा आवाज आहे.
(११) पारवा :-
गुटर -गू , गुटर -गूं असा घुमणारा आवाज
करणारा हा पक्षी .
(१२) पोपट:-
पोपटाचा रंग हिरवा असतो. चोच
बाकदार व लाल असते.
(१३) कोकिळ :-
कुहू कुहू असा मधूर आवाज करणारा
पक्षी आहे.
(१४) कावळा :-
कावळ्याचा रंग काळाकुट्ट असतो.
(१५) चिमणी :-
चिमणीचा रंग करडा असतो.
चिव चिव आवाज करते.
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
📞 9422736775
No comments:
Post a Comment