माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 4 February 2017

फळांची थोडक्यात माहिती

        🌲फळांची थोडक्यात माहिती🌲

         लेखन :--शंकर चौरे  (पिंपळनेर ) धुळे

(१) आंबा -        🍋
आंब्याला फळांचा राजा म्हणतात.
आंब्याच्या झाडाची उंची साधारणतः
तीस ते पन्नास फूट असते. या झाडाचे
आयुष्य किमान शंभर वर्षे असते .
आंब्याची पाने पाच-सहा इंच लांब असतात.
पानांचा रंग हिरवा असतो. आंब्याच्या
झाडांना येणाऱ्या फुलांना 'मोहर' म्हणतात.
कच्च्या फळांचा रंग हिरवा असून,त्याला कैरी
म्हणतात. कैरी पिकल्यानंतर केसरी, पिवळी,
लालसर रंगाचा आंबा होतो. कच्चे आंबे आंबट
लागतात. पिकल्यावर गोड किंवा आंबट -
मधूर लागतात. आंब्याचा आकार गोल व
लांबट असतो. हापूस, पायरी, केसरी अशा
आंब्याच्या विविध जाती आहेत.

(२) सफरचंद --      🍎
सफरचंदाचे झाड आकाराने लहान असते.
पाने अंडकार व टोकदार, दोन ते तीन इंच
लांब असतात. सफरचंद कच्चे असताना
हिरव्या रंगाचे असते. पिकल्यानंतर सफरचंदाचा
रंग लाल होतो. सफरचंद आंबट -गोड व गोड
असते. सफरचंद उभट गोलाकार व लंब
गोलाकार असतो.

(३) द्राक्षे --        🍇
द्राक्षाची वाढ वेलीवर होते. द्राक्षाचे वेल
वाढविण्यासाठी मांडव तयार करतात.
द्राक्षामध्ये बी असलेले व बी नसलेले असे
दोन प्रकार आहेत. द्राक्षाची पाने आकाराने
लहान व हिरवी असतात. द्राक्षांचे हिरवे व
काळे असे दोन रंग पहावयास मिळतात.
आकार लंबगोल असतो. त्याचे मणी
एकमेकांना जोडले जाऊन घड तयार होतो.
फुले पिवळसर रंगाची असतात. द्राक्षे कच्ची
असताना चवीला आंबट असतात.
पिकल्यानंतर द्राक्षांची चव आंबट -गोड होते.

                      लेखन:-
                        शंकर चौरे
                       पिंपळनेर
                         ता.साक्री जि.धुळे
                          ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment