संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹सम संख्या आणि विषम संख्या
याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती 🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(१) सम संख्यांची बेरीज सम संख्याच असते.
उदा. ४+२ =६
८+४=१२
(२)सम संख्यांची वजाबाकी सम संख्याच असते.
उदा. १२ - ८ =४
३२ - १६=१६
(३)सम संख्यांचा गुणाकारही सम संख्याच
असतो.
उदा. २ × ४ =८
८ ×२ =१६
(४)दोन विषम संख्यांची बेरीज सम संख्या
असते.
उदा. ९ + ११ = २०
(५)दोन विषम संख्यांची वजाबाकी सम संख्या
असते.
उदा. ११ - ३ =८
२७ - १५ = १२
(६) तीन किंवा पाच विषम संख्यांची बेरीज मात्र
विषम संख्याच असते.
उदा. १ + ९ + ३ = १३
३ + ७ + ११ = २१
१ + ५ + ११ + १३ + १९ =४९
(७) विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच
येते. उदा. ७ × ९ = ६३
५ × ९ × ७ = ३१५
(८)सम संख्या आणि विषम संख्या यांची बेरीज
विषम संख्या असते.
उदा. १४ + २३ = ३७
९ + १० = १९
(९) सम संख्या आणि विषम संख्या यांची
वजाबाकी विषम संख्या येते.
उदा. २८ - ११ = १७
४३ - ३४ = ०९
(१०) सम संख्या आणि विषम संख्या यांचा
गुणाकार सम संख्या येतो.
उदा. १२ × ३ = ३६
१७ × ४ = ६८
संकलक :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment