🚥महाराष्ट्राची मानचिन्हे 🚥
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर ) धुळे
🔹 राज्यप्राणी : शेकरू
ही खारींची एक प्रजात आहे. महाराष्ट्रात
प्रामुख्याने भीमाशंकर, फणसाड, माहुली,
वासोटा, आजोबा डोंगरात शेकरू आढळतो.
फळे व मधुरस हे त्याचे खाद्य आहे.
🔹राज्यफळ : आंबा
आंबा या वृक्षाला महाराष्ट्र राज्य वृक्ष म्हणून
मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील
हापूस जातीच्या आंब्यांची जगभरात निर्यात
होते. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या
देशाचे राष्ट्रीय फळ आहे. तर बांगलादेशचे
राष्ट्रीय झाड आहे.
🔹राज्यपक्षी : हरियाल (हरोळी )
हरियाल किंवा हरोळी या कबूतरवंशीय पक्षास
हिरवा होला, हरोळ किंवा हिरव्या रंगाचे
कबूतर या नावांनीही संबोधले जाते.
🔹राज्यफूल : जारूळ
जारूळ (किंवा तामन, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या
नावांनीही परिचित) हा सपुष्प वृक्ष आहे. याचे
फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. जारूळाचे
फूल लालसर -जांभळ्या रंगामुळे ओळखले
जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बहर
येऊन एप्रिल -जून महिन्यात फुले फुलतात.
भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी याचे
वृक्ष वाढते.
संकलन :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता. साक्री जि.धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment