लेखक/कवि-- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
😊 शब्द सोबती 😊
सागर समुद्रावर गेला
निर्मळ स्वच्छ झाला
वर्षा पावसात गेली
ओली चिंब झाली
सरिता नदीवर गेली
निर्मळ पवित्र झाली
छाया सावलीत बसली
थंड गार झाली
प्रकाश उजेडात गेला
आनंद हर्ष झाला
नरेश राजा झाला
विक्रमने पराक्रम केला
जवान सैनिक झाला
शौर्याने प्रताप केला
वीर शूर झाला
गौरव सन्मान झाला
लेखक/कवी :-
शंकर चौरे. (प्रा.शि)
पिंपळनेर (धुळे )
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment