माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 29 November 2019

विविध ऋतूंचे आपल्या जगण्यावर होणारे परिणाम समजावून घेऊया.


● विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा
   आपल्या जगण्यावर होणारा परिणाम पुढील
   प्रमाणे थोडक्यात सांगाता येईल.

  (१) पावसाळा --

---   सतत पावसामुळे दैनंदिन कामकाजावर 
 परिणाम होतो. पावसामुळे गटारे तुडुंब भरतात.
 मानवाला प्रवास करतांना त्रास होतो. पिण्याचे
 पाणी दूषित, गढूळ असते. त्यामुळे कावीळ,काॅलरा,
 विषमज्वर यासारखे रोग होतात.  पावसाळ्यातील
 कोंदड व दमट वातावरणामुळे अन्नावर लवकरच
 बुरशी येते. ते अन्न खाण्यायोग्य राहात नाही. तसेच
 या ऋतूमध्ये जड आहार घेण्याऐवजी पचायला
 हलका असा आहार घेतो. पाणी उकळून थंड करून
 आपण पितो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू नष्ट 
 होतात.
-----------------------------------------------------
(२) हिवाळा --

---  हिवाळा या ऋतूत हवामान थंड असते. या
 हवामानात वेगवेगळे फळे, भाजीपाला मिळतो.
 त्यामुळे मानवाची प्रकृती चांगली राहते.
 हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण
 लोकरीचे व उबदार कपडे वापरतो. शक्यतोवर
 उन्हात बसतो. शरीरात उष्णता निर्माण करणारे
 अन्नपदार्थ खातो.
-------------------------------------------------------
(३) उन्हाळा --

---  उन्हाळा या ऋतूत उष्ण हवामान असते. सर्वांना
 उन्हाचा त्रास होतो.  या उष्ण हवामानामुळे चक्कर
 येणे,  घाबरल्यासारखे होते. शरीराला घाम येतो.
 त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. या
 ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो. तसेच
 आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करतो.
==============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
           ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment