माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 11 November 2019

शोध आणि शोधक

       
(१) टेलिफोनचा शोध कोणी लावला  ?

---  अमेरिकन संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल
यांनी १८७६ मध्ये टेलिफोनचा शोध लागला. त्या
शोधाचं पेटंट ७ मार्च १८७६ रोजी बेल यांच्या नावाने
पेटंट आॅफिसमध्ये नोंदलं गेलं.  ४ एप्रिल १८७७
रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसविण्यात
आला.
--------------------------------------------------

(२) विमानाचा शोध कोणी लावला  ?

---  विमानाचा शोध अमेरिकेतल्या आॅरव्हील
राइट आणि विल्बर राइट या दोघा भावांनी
१९०३ मध्ये लावला.
-------------------------------------------------

(३) सिनेमाचा शोध कोणी लावला  ?

--- सिनेमाचा शोध फ्रान्समधल्या निकोलस आणि
जीन ल्युमियर या दोघा भावांनी १८९५ मध्ये लावला.
--------------------------------------------------

(४)दूरदर्शनचा (टेलिव्हिजन) शोध कोणी लावला ?

---  दूरदर्शनचा ( टेलिव्हिजन ) शोध ब्रिटनच्या
जाॅन लाॅगी बेअर्ड यांनी १९२६ मध्ये लावला.
अमेरिकेच्या पी. टी. फ्रान्सवर्थ यांनी इलेक्ट्रॉनिक
टेलिव्हिजनचा शोध १९२७ मध्ये लावला.
--------------------------------------------------

(५)  हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला  ?

---  लिओनाॅर्ड डी.  व्हिन्सी यांनी हेलिकॉप्टरची
कल्पना सर्वप्रथम मांडली. लुई ब्रेगट व रिर्चट
यांनी १९०७ मध्ये पहिले हेलिकॉप्टर तयार केले.
१९४० हेलिकॉप्टरची पहिली यशस्वी चाचणी
सिकोरस्की यांनी घेतली.
--------------------------------------------------

(६)  सर्वात प्रथम पेनचा शोध कोणी लावला  ?

---  फाऊंटनपेन किंवा द्रवरूप शाईवर चालणारा
पेन लेविस इ.  वाॅटरमन याने सन १८८४ मध्ये
शोधला. तर सन १८८८ मध्ये अमेरिकेच्याच
जाॅन जे. लाऊड यांनी बाॅल - पाॅईट पेनचे किंवा
बाॅलपेनचे तत्व शोधून काढले.  प्रत्यक्षतला
बाॅलपेन तयार केला तो एका हंगेरीयन पत्रकाराने
आणि रसायनशास्त्रज्ञ असलेल्या त्याच्या भावाने !
त्या दोन भावांची नावे अनुक्रमे लाझलो बिरो व
जार्ज बिरो अशी होती.  त्यांनी १९३०  साली
पहिला बाॅलपेन तयार केला.  १९४० च्या दशकात
या भावांनी बनविलेले बाॅलपेन  'बिरो ' या नावाने
विकले जात. अनेक पाश्चात्य देशांमध्ये आजही
बाॅलपेनला  'बिरो पेन' या नावाने विकले व
ओळखले जाते.

============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
          ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment