माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 15 November 2019

एक होता बिरसा  (कविता )

          
एक होता भगवान बिरसा
आदिवासींचा महान वारसा

 सुगाना वडिलांचं नाव
 उलिहातू जन्म गाव

गरीबीशी झगडत होते
मीठभाकर खात होते

मिशनरी शाळेत शिक्षण पूर्ण केलं
त्याचवेळी आदिवासींचं दुःखही पाहिलं

 तो काळ पारतंत्र्याचा होता
आदिवासींना अधिकार  नाकारला होता

जुलमी सत्तेची चीड आली
अन्यायाला वाचा फोडून दिली

इंग्रजांविरूध्द उलगुलान पुकारला
त्याच्या पराक्रमाने इतिहास घडला 

आदिवासींसाठी लढत राहिला
म्हणूनच देशाने स्वातंत्र्य पाहिला

स्वातंत्र्य लढ्यात रक्त सांडले
अखेरपर्यंत इंग्रजांशी भांडले

इंग्रज हरला,  पारतंत्र्य सरला
बिरसा आदिवासींचा हिरो ठरला.
----------------------------------------------
कवी /लेखक  - शंकर सिताराम चौरे
      काकरपाडा (चौपाळे)ता. साक्री जि. धुळे
         ९४२२७३६७७५

     

No comments:

Post a Comment