(1) चंद्र : --
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी भोवती देखील फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो.
---------------------------------
(2) पौर्णिमा :--
पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो, त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात. त्या रात्रीला पौर्णिमेची रात्र म्हणतात.
------------------------------
(3)!अमावास्या : --
पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही ती अमावास्या होय. त्या रात्रीला अमावास्येची रात्र म्हणतात.
----------------------------------------------------------------
(4)!महिना : --
एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केलेली असते. त्या काळास महिना असे म्हणतात.
----------------------------------------------------------------
(5) पंधरवडा :--
महिन्याचे दोन भाग केले जातात. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो, तर पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. हे दोन्ही कालावधी प्रत्येकी १५ दिवसांचे असतात. त्यांना पंधरवडा म्हणतात.
----------------------------------------------------------------
(6) चांद्र कालगणना :--
ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो, त्या कालगणना पद्धतीत १२ चांद्रमासांचे एक वर्ष होते व ते ३५५ दिवसांचे असते. यातील महिने २९ किंवा ३० दिवसांचे असतात.
----------------------------------------------------------------
(7) सौर कालगणना : --
ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो, तिला सौर कालगणना म्हणतात. सौर कालगणनेत वर्ष १२ महिन्यांत विभागलेले असते. भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे.
----------------------------------------------------------------
(8) चांद्रसौर कालगणना : --
ज्या कालगणनेस वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो, तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो, त्या कालगणनेस चांद्रसौर कालगणना असे म्हणतात.
=====================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775
No comments:
Post a Comment