माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3281867

Tuesday, 19 October 2021

शब्द सोबती ( समानार्थी शब्द )



पौर्णिमा पूनव पौर्णिमासी 
चंद्र  सुधाकर शशी
चांदणे ज्योत्स्ना चंद्रिका
तारे चांदण्या तारका

अमित असंख्य अगणित
सखा सोबती दोस्त
वारा वायू वात
रम्य मनोहर ललित

अंतरिक्ष तारांगण अंतराळ
पहाट उषा प्रात:काळ
मंदिर राऊळ देऊळ
नभ गगन आभाळ

भूमी वसुंधरा धरणी
पृथ्वी धरती क्षोणी
नदी सरिता तटिनी
जल उदक पाणी

प्रकाश तेज उजेड
प्रयत्न मेहनत धडपड
नाद छंद आवड
अविरत सतत अखंड

पर्वत गिरी अचल
रान अरण्य जंगल
ऐट रूबाब डौल
पांढरे शुभ्र धवल

सर्वत्र चहूकडे चौफेर
पर्वत गिरी डोंगर
काळोख तिमिर अंधार
सुरेख छान सुंदर
=========================={
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
         जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा 
        केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
        ९४२२७३६७७५

1 comment: