पृथ्वी स्वतःभोवती भोवऱ्यासारखी फिरत असते. तिला स्वतःभोवती एक फेरी मारायला २४ तास लागतात. २४ तास म्हणजेच एक पूर्ण दिवस, तिच्या स्वतःभोवती फिरण्यामुळेच दिवस व रात्र होतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. सूर्याभोवती फिरताना पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो, तो भाग प्रकाशात असतो. अशा प्रकाश असण्याच्या काळालादेखील आपण 'दिवस' असेच म्हणतो. जो भाग सूर्याच्या समोर नसतो तेथे अंधार असतो. त्या अंधाराच्या काळाला आपण 'रात्र' असे म्हणतो.
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला सुमारे ३६५ दिवस लागतात. या कालावधीला १ वर्ष म्हणतात. या एका वर्षाचे साधारणपणे १२ समान भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाला 'महिना' असे म्हणतात. प्रत्येक महिन्याला स्वतंत्र नाव आहे. प्रत्येक महिन्यात साधारणपणे चार सप्ताह असतात. सप्ताहात सात दिवस असतात. सप्ताहातील दिवसाला वार म्हणतात. प्रत्येक वाराला स्वतंत्र नाव दिलेले आहे. एकदा आलेला वार पुन्हा ७ दिवसांनंतर येतो. .
कोणत्या महिन्यात किती दिवस व कोणत्या दिवशी कोणती तारीख येते, ही माहिती दिनदर्शिकेवरून कळते.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment