माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 22 December 2021

कोनांचे प्रकार ( भूमिती माहिती -- कोन )



(१) शून्य कोन :-
----  शून्य अंश माप असणाऱ्या कोनाला शून्य कोन असे म्हणतात.

(२) लघुकोन  :-
---- ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त परंतु 90% पेक्षा कमी असते. त्या कोनास लघुकोन असे म्हणतात. 

(३)  काटकोन :
----  90° मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. 

(४) विशालकोन :-
----  ज्या कोनाचे माप 90° पेक्षा जास्त परंतु 180° पेक्षा कमी असते, त्या कोनास विशालकोन असे म्हणतात.

(५) सरळकोन :-
---- 180° मापाच्या कोनाला सरळकोन असे म्हणतात. 

(६) प्रविशाल कोन :-
---- ज्या कोनाचे माप 180° पेक्षा जास्त परंतु 360° पेक्षा कमी असते, त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. 

(७) पूर्ण कोन :-
---- 360° मापाच्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. 
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
       ता. साक्री जि. धुळे
      ९४२२७३६७७५


2.

No comments:

Post a Comment