माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 9 December 2021

फरक सांगा ( सजीव -- निर्जीव ) / ( हातांची बोटे आणि पायांची बोटे)



~~~~ सजीव --
(१)सजीवांना अन्न, पाणी आणि हवा यांची गरज असते.
(२) सजीव स्वत:हून हालचाल करतात.
(३) सजीवांची वाढ होते..

~~~~ निर्जीव --
१. निर्जीवांना अन्न, पाणी आणि हवा यांची गरज नसते.
२. निर्जीव स्वतःहून हालचाल करीत नाहीत.
३. निर्जीवांची वाढ होत नाही.

============================
~~~~  हातांची बोटे --
(१) हातांची बोटे लांब असतात.
(२) हातांच्या बोटांचा अंगठा इतर बोटांच्या समोरच्या बाजूस करता येतो.

~~~~ पायांची बोटे --
(१) पायांची बोटे आखूड असतात. 
(२) पायांच्या बोटांचा अंगठा इतर बोटांच्या समोरच्या बाजूस करता येत नाही.
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment