(१) उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे का घालतात?
----- पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत. म्हणून उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे घालतात.
------------------------------------------
(२) सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का असतो?
----- काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो, म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग असतो.
-------------------------------------------
(३) गॅसवर किंवा चुलीवर ठेवण्याच्या पातळ तांब्याच्या भांड्यांना द्रव बाहेरून तळाला माती का लावतात?
---- माती ही उष्णतेचे दुर्वाहक आहे. गॅसवर किंवा चुलीवर ठेवण्याच्या पातळ तांब्याच्या भांड्यांना बाहेरून तळाला माती लावल्याने भांड्यातल पदार्थाला मंद आच दिली जाते.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Danish shekh
ReplyDelete