(१) पृथ्वीचा आकार कसा आहे ?
उत्तर -- गोल
(२) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर -- पूर्व
(३) आठवड्याचे दिवस किती ?
उत्तर -- सात
(४) एक वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- बारा
(५) भारतीय सौर वर्षाचे महिने किती?
उत्तर :-- बारा
(६) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती?
उत्तर -- बारा
(७) मुख्य दिशा किती आहेत ?
उत्तर -- चार
(८) उपदिशा किती आहेत ?
उत्तर -- चार
(९) मुख्य ऋतू किती आहेत ?
उत्तर -- तीन
(१०) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर -- मोर
(११) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?
उत्तर -- वाघ
(१२) नदीच्या काठांना काय म्हणतात ?
उत्तर -- तीर / थडी
(१३) कोळी किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
(१४) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर --. शहामृग
(१५) ज्ञान देणा-या अवयवांना काय म्हणतात ?
उत्तर -- ज्ञानेंद्रिये
(१६) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर -- पाच
(१७) चवीचे प्रकार किती आहेत ?
उत्तर -- चार
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
्
Pranav Annasaheb surwase
ReplyDelete