माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 5 December 2021

पृथ्वीची आवरणे (भौगोलिक माहिती )



 
• शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण ही पृथ्वीची चार आवरणे आहेत.

(१) शिलावरण :-
--- पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भाग म्हणजे 'शिलावरण' होय.
 --- पृष्ठभागापासून शिलावरण १०० किमी खोल आहे.
--- शिलावरणावरच पर्वत, पठार, मैदाने इत्यादी भूरूपे दिसतात.
--- शिलावरण खडकांनी बनले आहे. खडकांचे अग्निज खडक, स्तरित खडक व रूपांतरित खडक असे तीन प्रकार आहेत.
--- जमिनीच्या सलग व मोठ्या भागास 'खंड' म्हणतात.
--- आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व अंटाविंटका ही सात खंडे आहेत. 
--- खंडांच्या दरम्यान महासागर आहेत.
-------------------------------------------------------
(२) जलावरण :-

--- पृथ्वीवरचा जलभाग म्हणजे 'जलावरण' होय. 
--- महासागर, सागर (समुद्र), सरोवर, तलाव, नदया हे सर्व जलावरणाचे भाग आहेत.
--- खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास 'महासागर' म्हणतात.
 --- पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक असे चार महासागर आहेत. सर्व महासागर सलग आहेत.
--- आकाराने लहान खाऱ्या पाण्याचे साठे म्हणजे 'समुद्र' होत.
--- काही समुद्र हे पूर्णत: भूवेष्टित असतात. 
--- तीन बाजूंनी जमीन असणारा खाऱ्या पाण्याचा जलाशय म्हणजे 'उपसागर होय.
--- जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग म्हणजे 'आखात' होय.
--- दोन जलाशयांना जोडणारा अरुंद जलाशय म्हणजे ' सामुद्रधुनी' होय.
------------------------------------------------------------
(3) वातावरण :-

--- पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणास 'वातावरण' म्हणतात.
---  वातावरण वायू, बाप्प, धूलिकण यांपासून बनले आहे.
--- वातावरणातून सर्व सजीवांना प्राणवायू मिळतो. 
---  पृष्ठालगत वातावरण दाट असते, जास्त उंचीवर हवा विरळ असते.
---  ओझोन वायू सूर्याची अपायकारक किरणे शोषतो. त्यामुळे जीवसृष्टयेचे रक्षण होते.
---------------------------------------------------------------
(४)  जीवावरण :-

---  पृथ्वीच्या तीनही आवरणात आढळणारी जीवसृष्टी म्हणजे ' ' जीवावरण ' .
---  जीवावरणात वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव असतात.
----  सजीवांना प्राणवायू, उष्णता, पाणी व अन्न लागते.
---  भूपृष्ठाजवळ सजीवांची संख्या जास्त आहे. 
---  जमिनीखाली आणि जलाशयात एका ठराविक खोलीपर्यंत जीवावरण आढळते.
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५



No comments:

Post a Comment