(१) दिवस म्हणजे काय ?
----- पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा २४ तासांचा कालावधी म्हणजे एक दिवस होय.
---------------------------
(२) आठवडा म्हणजे काय ?
----- आठवड्याचा कालावधी सात दिवसांचा असतो. सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो.
-----------------------------------------------------
(३) पंधरवडा म्हणजे काय ?
----- प्रत्येकी पंधरा-पंधरा दिवसांच्या कालावधीस पंधरवडा असे महणतात.
-----------------------------------------------------
(४) महिना म्हणजे काय ?
----- एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात.
-----------------------------------------------------
(५) वर्ष म्हणजे काय ?
----- पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा सुमारे ३६५ दिवसांचा कालावधी म्हणजे एक वर्ष होय.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment