माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 21 December 2021

गणितीय प्रश्नावली



(१)लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- १०

(२) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- ९

(३) लहानात लहान एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- १

(४) मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर --. ९९

(५) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- १००

(६) मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- ९९९

(७) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- सांगता येत नाही.

(८) एक शतक म्हणजे किती एकक  ?
उत्तर --  १००

(९) १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर --  १ वेळा

(१०)  १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --  ११ वेळा

(११) १  ते  १०० पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर -- २१ वेळा

(१२)  १ ते १०० पर्यंत  २ ते ९ अंक  हे प्रत्येकी किती वेळा येतात ?
उत्तर --  २० वेळा

(१३) १ ते १०० पर्यंत १ हा अंक शतकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर --  १ वेळा

(१४) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत ?
उत्तर --  ९

(१५) १ ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?
उत्तर -- ९०

(१६) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या एकूण किती आहेत ?
उत्तर -- १  ( एक )

(१७) १ दशक म्हणजे किती एकक ?
उत्तर -- १० एकक

(१८)  १ शतक म्हणजे किती दशक ?
उत्तर -- १० दशक

(१९)   १ ते १० पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- ५५

(२०)  १ ते १०० पर्यंत ९ हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --  २० वेळा
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment