१. वर्ण --
आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात.
--------------------------------------
२. अक्षर --
- ध्वनीच्या किंवा आवाजाच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.
अक्षर = कधीही नष्ट न होणारे
---------------------------------------
३. स्वर --
- ओठांचा किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनि बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात.
---------------------------------------
४. शब्द --
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर त्यांना शब्द असे म्हणतात.
----------------------------------------
५. वाक्य --
- अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात.
---------------------------------------
६. व्याकरण --
- भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
----------------------------------------
काही महत्त्वाचे -
१. मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या ४८ होती तर आधुनिक वर्णमालेत ती ५२ इतकी आहे .
२.ऋ,लृ या स्वरांचा चौदाखडीत समावेश होत नाही.
३. पुढील वर्ण भविष्यात नष्ट होऊ शकतात - ऋ,लृ ,ञ
४.र् या वर्णाला कंपित वर्ण असे म्हणतात, कारण याचा उच्चार करताना कंपन होते.
५. वर्णमालेतील ऑ ,ॲ हे इंग्रजी स्वर आहेत.
========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्राथमिक शिक्षक )
जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment