(१) मेंदूचे कार्य कोणते ?
----- (१) शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्यांचे नियंत्रण मेंदू करतो. (२) अवयवांच्या कामांमध्ये सुसूत्रता ठेवण्याचे कामही मेंदू करतो. (३) आपल्या सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूस मिळत असते. त्यानुसार मेंदू शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आज्ञा पाठवतो. (४) विचार करणे, स्मरण ठेवणे आणि निर्णय घेणे ही कामे मेंदू करतो.
===========================
(२) हृदय कोणते कार्य करते?
----- रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करते. त्यासाठी हृदयाचे सतत
आकुंचन-प्रसरण होत राहते. रक्ताची हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून हृदयाकडे ने-आण करण्याचे काम हृदय करते.
===========================
(३)!फुप्फुसाचे कार्य कोणते?
------ श्वास घेऊन नाकावाटे बाहेरच्या हवेतील ऑक्सिजन फुप्फुसांमध्ये रक्तात मिसळणे आणि श्वास सोडून फुप्फुसातील हवेबरोबर रक्तामधील कार्बन डायऑक्साइड शरीराबाहेर पाठवणे हे फुप्फुसाचे कार्य आहे.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
अनुष्का
ReplyDeleteEbebebehehee83
ReplyDeleteGhrr783646
Hrnrkrnrj93846