माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 7 January 2022

वनस्पती विषयी महत्त्वपूर्ण माहिती.



(१) वृक्ष : --
 ---खूप उंच वाढणाऱ्या टणक, मजबूत खोड असलेल्या वनस्पतींना वृक्ष म्हणतात. उदा. आंबा, वड, ताड, माड, जांभूळ.

(२)  झुडूप :--
---- टणक व मजबूत खोडाच्या, पण मध्यम उंचीच्या वनस्पतींना झुडुप म्हणतात. (उंची २ ते ३ मी.) उदा. संत्रे, लिंबू, जास्वंद, कण्हेर.

(३) वेल : --
---- कमकुवत खोड असणाऱ्या, आधाराने वाढणाऱ्या वनस्पतींना वेली म्हणतात. उदा. कारले, घोसाळे, काकडी, भोपळा, द्राक्षे, दोडका.

(४) रोपटे : --
---- मऊ आणि लवचीक खोड असलेल्या वनस्पतींना रोपटे म्हणतात. (उंची १ ते १.५ मी.)
----------------------------------------------

✓• वनस्पतींच्या कालावधीवरून केलेले वर्गीकरण :

●   बहुवार्षिक वनस्पती :--
---- ज्या वनस्पती अनेक वर्षे जगतात, त्या वनस्पतींना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात. उदा. वड, पिंपळ, कडुनिंब, साग, नारळ, जांभूळ.

● द्विवार्षिक वनस्पती : --
---- ज्या वनस्पतींचे आयुष्य दोन वर्षांत पूर्ण होते, त्या वनस्पतींना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. उदा. मुळा, गाजर, बीट.

● वार्षिक वनस्पती :--
 ---- ज्या वनस्पतींचे जीवनचक्र एक वर्षात संपते, त्या वनस्पतींना वार्षिक वनस्पती म्हणतात. उदा. सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका, तीळ.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
            ता. साक्री, जि. धुळे
            ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment