माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 17 January 2022

महाराष्ट्र -- सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ?
उत्तर -- राज्य

(२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६

(३) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र

(४)आपण महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतो ?
उत्तर --. १ मे

(५) भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे ?
उत्तर -- पश्चिम

(६) महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग पाडले आहेत ?
उत्तर -- सहा

(७)  महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई

(८) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती  ?
उत्तर --  नागपूर

(९) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर

(१०) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर

(११) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
              जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
             ९४२२७३६७७५

1 comment: