माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3276066

Saturday, 15 January 2022

म्हणजे काय ? ( ' ळ ' ची साखळी )



मंदिर म्हणजे देऊळ
स्वच्छ म्हणजे निर्मळ
कोयल म्हणजे कोकीळ
नारळ म्हणजे श्रीफळ

पंकज म्हणजे कमळ
मस्तक म्हणजे कपाळ
आकाश म्हणजे आभाळ
गंध म्हणजे परिमळ

बैल म्हणजे पोळ
शक्ती म्हणजे बळ
क्रीडा म्हणजे खेळ
वेदना म्हणजे कळ

अवर्षण म्हणजे दुष्काळ
मुबलक म्हणजे पुष्कळ
मोहिनी म्हणजे भुरळ
उषा म्हणजे सकाळ

ललाट म्हणजे निढळ
राजा म्हणजे भूपाळ
देवालय म्हणजे राऊळ
दु:खी म्हणजे व्याकूळ

त्रास म्हणजे छळ
दुर्जन म्हणजे खळ
यातना म्हणजे शूळ
समय म्हणजे वेळ

रांग म्हणजे ओळ
अंतरिक्ष म्हणजे अंतराळ
काळजी म्हणजे कळकळ
घास म्हणजे कवळ
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि.‌धुळे
           ९४२२७३६७७५

1 comment: