माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 25 January 2022

आपला देश -- सामान्यज्ञान ( प्रश्नावली)



(१) आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत.

----  राष्ट्रीय सणांतून नागरिकांत एकात्मतेची भावना निर्माण होतें. राष्ट्रीय सण साजरे केल्याने ही एकात्मतेची भावना टिकून राहते व जोपासली जाते. या ऐक्यभावनेमुळे देशाची प्रगती होते. म्हणून आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत.
-----------------------------------------------------

(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 

---- आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास २६ जानेवारी १९५० पासून सुरुवात झाली. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
-----------------------------------------------------

(३) प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोण कोण सहभागी होतात?

----- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात : (१) भूदल, नौदल आणि हवाईदल देशाची तीन संरक्षक दले (२) विविध राज्यांतील काही विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्रसे निवडक विद्यार्थी (३) ज्या विद्यार्थ्यांना शौर्यपदके मिळाली आहेत असे विद्यार्थी हे सर्वजण सहभागी होतात.
-----------------------------------------------------

(४) राष्ट्रीय प्रतीकांतून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?

 ----- (१) राष्ट्रीय प्रतीकांतून राष्ट्राबद्दलचे प्रेम व्यक्त होते. (२) नागरिकातील ऐक्यभावना बळकट होते. या गोष्टी राष्ट्रीय प्रतीकांतून साध्य होतात.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
            केंद्र - रोहोड,  ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

2 comments: