माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 19 April 2017

पर्यावरण संरक्षण व संवर्धन

         पर्यावरण संरक्षण व संवर्धन

  माणसाने निसर्गाच्या रचनेमध्ये हस्तक्षेप
केल्याने जंगल ओसाड पडणे,पाणी, हवा
दूषित होणे, जमीन नापीक बनने, पाऊस
वेळेवर व पुरेसा न पडणे असे दुष्परिणाम
जाणवत आहेत. पर्यावरणाचे संतुलन
बिघडल्याने या समस्या जाणवत आहेत.
या समस्यांच्या निराकरणासाठी पर्यावरणाचे
स्वरूप समजून घेणे आणि सभोवतालच्या
निसर्गाचे योग्यप्रकारे संरक्षण व संवर्धन करणे
अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जंगलतोड
पूर्णपणे थांबविणे, वन्य पशुंसाठी
अभयारण्याची व्यवस्था करणे,खनिज
संपत्तीचा काटकसरीने वापर करणे, सर्व
प्रकारच्या प्रदूषणांवर नियंत्रण राखणे.
यासारखे उपाय योजने क्रमप्राप्त आहे.
  त्याचप्रमाणे वृक्ष लागवड करणे, कुरणांचे
क्षेत्र वाढविणे या मार्गांनी पर्यावरणांचे संवर्धन
करावे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन मानव
जाणीवपूर्वक करू शकतो. कारण मानव
हा पर्यावरणातील सर्वात बुध्दीमान प्राणी
आहे. यासाठी पुढील चार सुत्रे महत्वाची
आहेत.

(१)वापर पूर्णपणे टाळणे --
--प्लॅस्टिक पिशव्यांचा व तत्सम पदार्थांचा.

(२)वापर कमीत कमी करणे --
-- विज, पाणी, इंधनावर चालणारी वाहणे.

(३)पूर्णपणे वापर करणे -
-- कागदाच्या दोन्ही बाजूस लिहिणे, कपडे,
   चमड्याच्या वस्तू इ. पूर्णपणे वापरणे.

(४) पुनर्वापर करणे --
-- सांडपाणी झाडांना द्यावे, घरातील
  केरकचरा यापासून कंपोस्ट, सेंद्रिय खत
  तयार करणे.
       वरील सर्व उपाययोजना व त्यांची
अंमलबजावणी याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन
तसेच संरक्षण होण्यास मदत होते.

      ✍शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment