' ळ ' चे सोबती शोधा
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर ) धुळे
९४२२७३६७७५
उद्देश :- शब्द संख्या वाढविणे, विचारांना
चालणे देणे.
सूचना :-हा खेळ कितीही मुलांत खेळता येईल.
वेळ १० मिनिटे. पुढे काही शब्द दिलेले
आहेत. त्या शब्दांचे समानार्थी शब्द दोन
अक्षरी आहेत व त्याचे शेवटचे अक्षर 'ळ'आहे.
पुढे दिलेले शब्द तुम्ही दोन मिनिटे बघा व
नंतर 'ळ ' बरोबर कोणता सोबती येईल
तो शोधा. जो सर्वांत जास्त शब्द दिलेल्या
वेळेत तयार करील तो जिंकेल.
उदा.
प्रश्न शब्द उत्तर
(१) मूल -- बाळ
(२) शक्ती -- बळ
(३) भात -- साळ
(४) आरोप -- आळ
(५) कपाळ -- भाळ
(६) नुकसान -- झळ
(७) अरुंद गल्ली -- बोळ
(८) कानाची कड -- पाळ
(९) ऊसापासून बनणारा - गूळ
(१०) नाटकाचा प्रयोग -- खेळ
(११) चिकटविण्याचा पदार्थ - खळ
(१२) वेदना -- कळ
(१३) माराची खूण -- वळ
(१४) हार -- माळ
(१५) मासे पकडायचे साधन - गळ
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment