आपल्या पाल्याचे मित्र बना !
कुमारावस्था १३ ते १८ वर्षे
हिच वेळ आहे पाल्याला समजून घेण्याची
स्वतःमधील सहनशीलतेची कसोटी
पाहण्याची
आपलंही तरूणपण आठवून,त्याच्या सोबत
मित्र बनून राहण्याची !
पालकहो,
आपल्या पाल्याचे १३ ते १८ वर्ष वय
म्हणजे त्याला Teenage म्हटलं जाते. या
वयात त्याचे वजन साधारणत: ३५ व ४८
किलो पर्यंत असते. या वयात त्याच्या मेंदूचा
विकास २% होतो. हा काळ म्हणजेच
स्वत:चा विकास होण्याचा अर्थात पूर्ण
शरीर धारण करण्याचा काळ, वैचारिक
परिपक्वता न आल्याने मित्र मैत्रिणी कोणत्या
निवडाव्यात, वर्तनाच्या मर्यादा कोणत्या
असाव्यात हे न समजण्याचा काळ, मन
गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने बेचैन व
स्वत: निर्णय काय घ्यावा हे न समजण्याचा
काळ, 'मी आता मोठा झालो आहे.' अशा
स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होण्याचा काळ.
आज आपण विज्ञान युगात वावरत
आहोत, काळ झपाटय़ाने बदलत आहे.
दूरदर्शनवर चांगल्या गोष्टी दिसतात.त्याचप्रमाणे
ऐकू नये, पाहू नये अशाही गोष्टी कानांवर,
डोळ्यासमोर येत आहे.त्याप्रमाणे मोबाईलचा
अतिवापर या सर्वांमुळे आपण व आपली
मुले यांच्यातील संवाद कमी झाला आहे.
दोन्ही पालक नोकरी निमित्ताने बाहेर असल्याने
नको तितक्या गरजा पुरविल्या जात आहेत.
येथे एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटते की,
आपलं हे मुल मोठं होताना पाहिलेले असूनही
त्याचं मोठं होणं स्वीकारायला आपलं मन
तयार नाही.
याच काळात मुले कौतुकासाठीही
आसुसलेली असतात. त्यांच्याशी सुसंवाद
साधून, त्यांना वेळ देवून त्यांना आपल्या
चर्चेत सहभागी करायला हवे. त्यांच्या मित्र
मैत्रिणींशी आदराने बोलून,सुट्टीच्या कालावधीत
नातेवाईकांमध्ये मिसळण्याची संधी द्यायला
हवी.
दूरदर्शनच्या बातम्यांमधून कळणारी महागाई,
दहशतवाद,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,अगदी अलिकडेच बारामती मधील१७ वर्षाच्या ११वीच्या
मुलीने केलेली आत्महत्या,संसदेत चाललेला
गोंधळ, पाण्याचा प्रश्न याविषयी आपल्या
मुलांशी वैचारिक बैठक घेतल्यास मुले
आवर्जुन वर्तमान पत्र,मासिके वाचतील, टीव्ही
वरील बातम्या रोज पाहून आपली मते व्यक्त
करतील,वेगळ्या विचारात स्वतःला गुंतवून
ठेवतील.
आई -बाबांची आपल्या पाल्याशी वागणूक
सारखेपणाची असावी.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment