पर्यावरण उपक्रम
बर्फाचा वापर टाळा.
उन्हाळ्याच्या दिवसात आपण उपहारगृहात
गेलो, रसपानगृहात गेलो किंवा फळांचा
रस पिण्यास गेलो, तर गोठलेल्या पाण्याशी
आपला संबंध येण्याची दाट शक्यता असते.
ऊसाच्या रसाच्या पेल्यात किंवा फळांच्या
रसात ह्या प्रकाराने पाणी मिसळले जाते.
हे गोठलेले पाणी, म्हणजेच बर्फ, हा
केवळ तात्कालिक गारवा निर्माण करणारा
पदार्थ आहे. बर्फाचे थंडगार पाणी पितांना
बरे वाटते, पण त्याने तहान भागत नाही
असा अनुभव येतो.शिवाय अतिशीत पदार्थांचं
अशा प्रकारे सेवन करणं शरीरालाही
अपायकारक असतं. बर्फ करण्यासाठी
वापरलेले पाणी अनेकदा अशुद्ध असते.
अनेकांना साथीच्या रोगांची लागण ऊसाच्या
रसातल्या बर्फाने होते. ह्या सगळ्याला एक
पर्यावरणाची बाजूही आहे -ती महत्वाची.
बर्फ तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर
ऊर्जा खर्च होते. पाण्यातली उष्णता काढून
घेऊन ते गोठवण्यासाठी ही ऊर्जा लागते.
एका अनावश्यक,अपायकारक पदार्थासाठी
दुर्मिळ ऊर्जा खर्च करणे बरोबर आहे का ?
बर्फाचा एक -अष्टमांश भाग आपल्याला
दिसतो आणि उरलेला पाण्यात असतो तो
दिसत नाही. हेच प्रमाण बर्फाच्या फायद्या
तोट्याचं आहे. एक अष्टमांश फायदा आपण
बघतो, पण सात- अष्टमांश तोटा मात्र
आपल्याला दिसत नाही.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment