माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3281327

Tuesday, 18 April 2017

भेटीच्या स्मृती

          🔹पर्यावरण उपक्रम 🔹

                भेटीच्या स्मृती

      एखाद्या ठिकाणी सहलीला गेलं की,
त्या ठिकाणी लोकांना आपलं नाव खडूनं
लिहिण्याची किंवा दगडात कोरण्याची सवय
असते.
  अशा प्रकारे लिहून तो परिसर खराब करणे
ही मनाची एक विकृती आहे. भिंतीवर
लिहिल्याने वा दगडावर कोरल्याने कुणाचेही
नाव अजरामर होत नाही. मात्र आपण भेट
दिल्याची स्मृती तिथे दीर्घकाळ टिकून राहावी
अशी इच्छा असेलच, तर तिला एक विधायक
पर्याय आहे.
  या परिसरात बिया उधळण्याचा ! आपण
घरी खाल्लेल्या फळांच्या बिया टाकून न देता
साठवून ठेवा. फुलांच्या बिया साठवा.
सहलीला जाताना त्या बरोबर न्या. अन् अशा
ठिकाणी त्या बिया नुसत्या उधळा. पुढच्या
पावसाळ्यात त्या रूजतील. तो परिसर
फुलांनी बहरेल. फळांच्या बिया रूजून काही
वर्षांनी ती झाडे फळे धरू लागतील. त्या
प्रत्येक फुला -फळाच्या रूपाने आपली स्मृती
जिवंत राहील !
   सहलीलाच नव्हे, तर कुठेही प्रवासाला
जाताना अशा बिया सोबत न्या. रस्त्याच्या
कडेला त्या टाकत राहा. पावसाळ्यात
रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुलांची रांगोळी
उगवलेली आपल्याला दिसेल !

  ✍शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
         जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
        ता.साक्री जि.धुळे
         📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment