माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 1 April 2017

थोर भारतीय विचारवंत

              थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--
           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील
हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.
सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली.
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

(२) स्वामी विवेकानंद :--
            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता
येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे
भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे
प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९४२ रोजी महानिर्वाण.

(३) रवींद्रनाथ टागोर :--
            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .
'जन-गन -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली
हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१.

(४) न्यायमूर्ती रानडे :--
           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक
जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर
राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१.

(५)लोकमान्य टिळक :--
             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे.
भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .
'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव
सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे प्रसिद्ध आहेत.
१ आॅगस्ट १९२०.

(६) महात्मा गांधी :--
            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी
२ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक
रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास सत्याग्रहाच्या
मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा
भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली
लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८.

(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--
              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या
तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार.

(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--
               जन्म १४ एप्रिल,१८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी. प्रख्यात कायदेपंडित.
भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६.

(९) सुभाषचंद्र बोस :--
               जन्म २३ जानेवारी १८५६ रोजी कटक
येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत.
"तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे
प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी
विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते.

(१०) इंदिरा गांधी :--
               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग.
शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती '
ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना.
मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.
                
                      संकलक :--
                         शंकर चौरे
                         जि.प.प्रा शाळा बांडीकुहेर
                         ता.साक्री जि.धुळे
                          ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment