■उपक्रम■
☆प्राणी /पक्षांविषयी थोडक्यात
माहिती सांगा.
---------------------------------------------
(१) गाय 🐄
गाय हा पाळीव प्राणी आहे.गाईचा रंग
पांढरा, तांबूस किंवा काळा असतो.
तिला दोन शिंगे असतात. तिचे शेपूट
गोंडेदार असते. गाईचे डोळे काळेभोर
व टपोरे असतात. गाय गवत खाते.
गाईपासून आपल्याला दूध मिळते.
----------------------------------------------
(२) वाघ 🐅
वाघ हा जंगली प्राणी आहे. तो बलवान
असतो आणि क्रूर असतो. तो आकाराने
लांबट असतो. त्याचे शेपूट लांब असते.
त्याचे पंजे मोठे व मऊ असतात. पण
पंजांची नखे मात्र तीक्ष्ण असतात. त्याचे
डोळे तेजस्वी असतात.
वाघ जंगलात गुहेत राहतो.तो जंगलातील
प्राण्यांची शिकार करून खातो.
-------------------------------------------------
(३) पोपट
पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा
रंग हिरवागार असतो. त्याची चोच
लालभडक, बाकदार व धारदार असते.
त्याच्या गळ्याभोवती काळी रेघ असते.
त्याला कंठ म्हणतात.
पोपट हा खूप लोकांचा आवडता पाळीव
पक्षी आहे.
-----------------------------------------------
(४) खार 🐿
खार हा चिमुकला प्राणी आहे. खार
आकाराने लांबट असते. तिला चार
पाय असतात व झुबकेदार शेपूट असते.
तिचे कान छोटे आणि डोळे बारीक
असतात. खारी तांबूस, पिंगट किंवा
पांढऱ्या करड्या रंगाच्या असतात.
त्यांच्या पाठीवर तीन किंवा पाच पट्टे
असतात.
-----------------------------------------------
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment