मानवी संरक्षक : झाडे
आज प्रदूषणाचा त्रास सर्व जगाला होत
आहे. आज हवेत प्रदूषण आहे. पाण्यात
आहे,औषधातही प्रदूषण आहे. जगभर
त्यावर चर्चा होते. परिसंवाद होतात. पण
ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.
हवेतील प्रदूषण मानवनिर्मित आहे.
त्यापैकी कर्बद्विवायू हाही मानवनिर्मित
कारखाने, इंधनाचे ज्वलन, वाहने यामुळे
होतो. यामुळे हवेचे संतुलन बिघडते,
निरनिराळे रोग होतात.
प्रदूषणावर नियंत्रण करण्यास वृक्षलागवड
हा एक उपाय आहे. वने,उपवने निर्माण
करणे आवश्यक आहे.
● *झाडामुळे हवा शुध्द होते* :-
--- वातावरण शुध्द हवे असे प्रत्येकालाच
वाटते. त्यात प्राणवायू जास्त असणे जरुरी
आहे. हा प्राणवायू झाडे सोडतात. त्यामुळे
झाडे जास्त तर प्राणवायू जास्त. प्राणवायू
जास्त तर रोगराई कमी हे गणित दिसते.
● *झाडांना महत्त्व* :-
झाडांना महत्त्व देण्याचे कारणही तसेच आहे. हवेतील वाढणाऱ्या अफाट कर्बद्विवायू शोषण
झाडे करतात. हवेत प्राणवायू सोडतात.
● *झाडे काय करतात ?* :-
-- झाडे अनेक प्रकारे प्रदूषण नियंत्रण
करतात.
(१)प्रदूषित हवेत शुध्द हवा मिसळतात.
त्यामुळे हवेचा विषारीपणा कमी होतो.
(२)अनेक विषारी कण पानातून, खोडातून
व मुळ्यातून झाडाव्दारे पकडून ठेवले
जातात.
(३)झाडाव्दारे अनेक सुगंध व कीटकनाशक
द्रव्ये हवेत सोडली जातात.
(४)वातावरणातील तापमानाची तीव्रता
झाडामुळे कमी होते. थंड हवा उत्साह
" वाढवते.
थोडक्यात काय तर झाडं ही प्रदूषण
नियंत्रक आहेत. ते मानवाचे संरक्षक
आहेत. त्यांना आपण जपल्यास ते
आपले अनेक रोगांपासून संरक्षण करतील.
✍शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment