माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 18 April 2017

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर


    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
      (भीमराव रामजी आंबेडकर )

        डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर
समाजसुधारक होते. त्यांचा जन्म
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील
महू या गावी एका गरीब कुटुंबात झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे
मूळ गाव. त्यांचे सुरूवातीचे प्राथमिक
शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले.
  माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईत आले.
उत्तम  तऱ्हेने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळवून
एल्फिन्स्टन कॉलेजात गेले. तिथून पदवी
संपादन केल्यावर बडोदे सरकारच्या मदतीने
भीमराव अमेरिकेस गेले. अर्थशास्त्रात
एम. ए.; पी. एच. डी. पदवी प्राप्त करून
ते परत भारतात आले. मुंबईत सिड्नहॅम
कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले.
नोकरी करीत असतानाच आपल्या अस्पृश्य
समजण्यात येणाऱ्या बांधवांना त्या त्रासातून
मुक्त करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण
केली.
       पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू 
महाराजची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले
आणि अर्थशास्त्रातील डी. एस. सी. ही
सर्वोच्च पदवी व बॅरिस्टर ही पदवी संपादन
करून ते मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात
आधी प्राध्यापकाची व मग प्राचार्य म्हणून
नोकरी करू लागले. महाडचे चवदार तळे
व नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना
खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले.
  बाबासाहेबांना दलित समाजाविषयी खूप
कळकळ होती. दलितांची सुधारणा व्हावी.
म्हणून ते झटले. जातीभेद नाहीसा व्हावा,
असे त्यांना वाटे. यासाठी लोकांनी खूप
शिकले पाहिजे, असे त्यांना वाटे. यासाठी
त्यांनी शाळा व महाविद्यालये काढली.
शिक्षणाचा प्रसार केला.
  त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी
स्वतः खूप ग्रंथ लिहिले होते. डाॅ. बाबासाहेब
आंबेडकर कायदेपंडित म्हणून ओळखले
जात.ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार
होते.
  ६ डिसेंबर १९५६ मध्ये त्यांचे निर्वाण झाले.
  अशा या भारताच्या थोर सुपुत्राला सरकारने
' भारतरत्न ' ही पदवी बहाल केली.

 संकलक :- शंकर चौरे  (प्रा.शिक्षक)
            पिंपळनेर  ता.साक्री जि.धुळे
         📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment